Headlines

83 Movie : जिंकण्याची आशा सोडून हनीमूनचं तिकीट बुक केलं पण जे घडलं ते….

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया 83 चा वर्ल्ड कप जिंकेल अशी कोणालाच आशा नव्हती. पण आशा होती ती कर्णधाराला. त्याच्या एका शब्दावर जोशावर टीम इंडियाला खेळण्याचं बळ मिळालं आणि अखेर निकालही तेवढाच खणखणीत लागला. टीम इंडियाने 83 चा वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण जगाला टीम इंडिया काय चीज आहे ते दाखवून दिलं. 

जगभरातील अनेक दिग्गजांची बोलणारी तोंड 83 च्या वर्ल्ड कप विजयानंतर बंद झाली. 1983 रोजी वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला. 1983 च्या वर्ल्ड कपवर आधारीत 83 सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा आता OTT प्लेटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. 

या सिनेमानं फक्त क्रिकेटप्रेमींची मनच जिंकली नाहीत तर जुन्या आठवणी आणि किस्सेही ताजे केले. 83 सिनेमाच्या निमित्ताने त्यावेळी घडलेला एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला. 

टीम इंडियाचे 1983 चे ओपनर श्रीकांत यांचं 83 वर्ल्ड कपच्या 2 महिने आधी लग्न झालं होतं. टीम इंडियाने त्यावेळी 2 सामने जिंकले होते. मात्र वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचू असं कोणालाच वाटलं नव्हतं. 

आपण फायनलपर्यंत पोहोचू शकत नाही अशी मनोधारणाच त्यांनी केली होती. त्यामुळे श्रीकांत यांनी आपल्या पत्नीसोबत हनीमूनचा प्लॅन केला. श्रीकांत त्यावेळी 24 वर्षांचे होते. टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही अशी त्यावेळी त्यांची मानसिकता होती. 

श्रीकांत यांनी सामने खेळून झाल्यावर अमेरिकेला हनीमूनसाठी जाण्याची तिकीटंही बुक केली. त्यावेळी वर्ल्ड कपसाठी श्रीकांत सुनील गावस्कर यांच्या सांगण्यावरून इंग्लंडला वर्ल्ड कपसाठी थांबले होते. 

श्रीकांत यांचा हनीमूनच्या प्लॅनिंगचा ‘डाव’ कपिल देव यांनी उधळून लावला. टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली. श्रीकांत यांची हनीमूनला जाण्याची वेळ आणि टीम इंडियाची लॉर्ड्सवर वर्ल्ड कप खेळण्याची वेळ एकच होती. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला पुन्हा भारतात परत यावं लागलं. त्यामुळे श्रीकांत यांचा हनीमूनचा प्लॅन अपूर्णच राहिला 

83 सिनेमातही हा किस्सा दाखवण्यात आला आहे. श्रीकांत मस्करीमध्ये त्याने केलेला हा प्लॅन देखील सांगतानाचा हा सीन दाखवण्यात आला आहे. श्रीकांत भावुक होत कॅप्टन कपिल देव यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण होत असल्याचंही सांगताना या सीनमध्ये दिसत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *