Headlines

73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘या’ मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर

[ad_1]

Ghat Marathi Movie in 73rd Berlin International Film Festival : 16 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बर्लिन येथे होणार्‍या जगातील आघाडीचा चित्रपट महोत्सव होत आहे. यावेळी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘घात’ (Ghat) या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.  छत्रपाल निनावे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. छत्रपाल यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. भारतातील माओवादी प्रभावित जंगलांच्या किनाऱ्यावरील पार्श्वभूमीवर उलगडणारा स्लो-बर्न थ्रिलर आहे. ज्यात शत्रू, नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आयुष्य ये एकमेकांवर आधारीत आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

या चित्रपटाविषयी छत्रपाल म्हणाले, ‘हा एक मोठा, खडतर आणि साहसी प्रवास होता, पण आता बर्लिन येथे आमच्या चित्रपटाचा प्रीमियर होणे हा खूप मोठा सन्मान वाटतो. या वाटेवर आम्हाला अनेक कलाकारांनी प्रेरणा दिली. ‘घात’ हा चित्रपट विश्वास, विश्वासघात आणि हल्ला यावर आधारलेला आहे. घनदाट जंगलात शिरताना त्यातील व्यक्तिरेखांच्याही मनांत खोलवर नेणारा हा थ्रिलरपट आहे. आमच्या चित्रपटावर विश्वास ठेवल्याबद्दल मी प्लॅटून वन फिल्म्स आणि दृष्यम फिल्म्सचा आभारी आहे. बर्लिन, भारत आणि त्यापलीकडील्याही प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल अशी मला आशा आहे.’

World premiere of Marathi film at 73rd Berlin International Film Festival

अभिनेता जितेंद्र जोशी त्याला आलेला शूटिंगचा अनुभव सांगत म्हणाला, ‘मध्य भारतातील जंगलातील लोकेशन्सवर शूटिंग करणे नक्कीच अवघड आणि आव्हानात्मक होते, पण या अतुलनीय बातमीमुळे केलेली मेहनत फळाला आल्याचे वाटते. चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू यांनी खूप मेहनत घेतली असल्यामुळे टीमसाठी, मराठी सिनेमासाठी आणि संपूर्ण भारतीय सिनेमासाठी हा एक मोठा विजय आहे.’

हेही वाचा : VED Box Office Collection ‘वेड’ नं 50 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर Riteish Deshmukh ची खास पोस्ट व्हायरल

प्लॅटून वनचे शिलादित्य बोरा आणि दृष्यमचे मनीष मुंद्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, हे दोघेही भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यासाठी फिल्म जगतात प्रसिद्ध आहेत. मिलापसिंह जडेजा आणि संयुक्ता गुप्तांसोबत मिलिंद शिंदे (हर हर महादेव आणि बाबू बँड बाजा), जितेंद्र जोशी (तुकाराम, गोदावरी आणि सेक्रेड गेम्स), सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम हे प्रसिद्ध मराठी कलाकार यात आहेत. 2017 सालच्या पुरस्कार-विजेत्या ‘न्यूटन’ या हिट चित्रपटानंतर ‘घात’ या चित्रपटाने निर्माते शिलादित्य बोरा आणि मनीष मुंद्रा यांना दुसऱ्यांदा बर्लिनेल येथे जाण्याची संधी दिली आहे. राजकुमार राव अभिनीत ‘न्यूटन’चा 2017 मध्ये बर्लिनेलमध्ये प्रीमियर झाला होता आणि त्यानंतर हा चित्रपट भारतातर्फे अधिकृतपणे ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. 

दृष्यम फिल्म्सचे संस्थापक-निर्माते मनीष मुंद्रा म्हणाले, ‘आम्ही जवळपास एक दशकापासून दृष्यम फिल्म्सच्या बॅनरखाली पुरस्कार-विजेते चित्रपट झालो आहोत, पण ‘घात’ हा आमचा पहिला प्रादेषिक चित्रपट असल्याने माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. या चित्रपटासह बर्लिनेल येथे परतण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेणाऱ्या टीमचा आभारी आहे.’ दरम्यान, हा चित्रपट यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *