Headlines

“७० वर्षांचा असूनही…”, रामदास कदमांनी बोलून दाखवली आदित्य ठाकरेंना ‘साहेब’ म्हणावं लागल्याची खंत; म्हणाले, “दीड वर्ष माझ्या…” | ex shivsena leader ramdas kadam slams Aditya thackeray scsg 91

[ad_1]

शिवसेना खासदारांमध्ये फूट पडत असताना ‘मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही’ असा दावा करणारे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी पर्यावरण मंत्री असणाऱ्या रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे चिरंजीव आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. प्लास्टिकबंदी आपण केली मात्र त्याचं श्रेय आदित्य ठाकरेंना मिळाल्याची खंतही रामदास कदम यांनी व्यक्त केली.

नक्की पाहा >> Photos: ‘मातोश्रीवर बोलवलं अन्…’, ‘बाळासाहेब असते तर..’, ‘हात जोडून विनंती केली पण…’; रामदास कदमांच्या हकालपट्टीचं कारण ठरलेलं पत्र

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळाले, अशी टीकाही कदम यांनी पत्रातून केली होती. रामदास कदम यांनी टीका करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. या हकालपट्टीनंतर आज टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी शिवसेनेतील कारभारासंदर्भात संताप व्यक्त केला.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

माझी हकापट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही असं सांगत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे हे कोणतंही शासकीय पद अथवा मंत्रीपद नसताना आधी आपल्या केबिनमध्ये येऊन बसायचे आणि अधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्यासाठी सांगायचे असा दावा केलाय. त्याचप्रमाणे मी ७० वर्षांचा असूनही केवळ आदित्य हे मातोश्रीवरील आहेत आणि ठाकरे आहेत म्हणून त्यांना साहेब म्हणतो असंही कदम म्हणालेत.

नक्की वाचा >> “जसं काही त्यांचं…”; नातवाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोला

“आदित्यसाहेब… आता मला साहेब म्हणावं लागतं भाऊ. काय करणार?”, असा टोला कदम यांनी मुलाखतीदरम्यान लगावला. “माझं वय ७० आहे पण आदित्यलाही मला साहेब म्हणावं लागतंय. म्हणतोय साहेब कारण ते ठाकरे आहेत. मातोश्रीमधले आहेत,” असं कदम यांनी म्हटलं.

“आदित्यसाहेबांची ही भाषा? अन्य कुठल्या नेत्याच्या तोडून ही भाषा आम्ही समजू शकतो. पण आदित्यजींनी संयम पाळायला हवा होता,” असं कदम म्हणाले. “आदित्यजी ठाकरे दीड वर्ष माझ्या केबीनमध्ये येऊन बसायचे. मी पर्यावरण मंत्री होतो. मला म्हणायचे, भाई या अधिकाऱ्याला बोलावा, मिटींग लावा. खरं तर मंत्रालयामध्ये बसून अशाप्रकारे बाहेरच्या माणसाला मिटींग लावता येत नाही. पण मी लावल्या मिटींग कारण ते उद्धवजींचे चिरंजीव होते,” असं कदम म्हणाले.

नक्की वाचा >> “१२ नाही आमच्यासोबत एकूण…”; शिवसेना खासदारांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत पोहचल्यानंतर मोठा गौप्यस्फोट

“प्लास्टिकबंदी मी केली क्रेडीट आदित्य ठाकरेंना दिलं. मातोश्री मोठी होऊ द्या आपली असा विचार केला. मला कुठं माहिती होतं तेच आदित्य ठाकरे जे कालपर्यंत मला काका काका म्हणत होते ते मंत्रालयात माझं खातं घेऊन बसणार आहेत,” असा टोला कदम यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *