7 व्या वेतन आयोगासाठी शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मेल पाठवा आंदोलन


महाविद्यालयीन षिक्षकेतरांनी 7 व्या वेतन आयोगासाठी केले मेल राज्यभरातून पाडला मेलचा पाउस
बार्शी /प्रतिनिधी- आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व महाविद्यालयीन षिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतरांना 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासाठी मेल करण्याचे अंदोलन दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आले. हे हजरो मेल मा. उदय सामंत साो., उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र, राज्य, मुंबई, मा. सचिव साो., उच्च व तंत्र षिक्षण, महाराष्ट्र, राज्य, मुंबई व मा. संचालक साो., उच्च व तंत्र षिक्षण, महाराष्ट्र, राज्य, पूणे यांच्या शासकीय मेल आयडीवर केले गेले. हे अंदोलन संघटनेचे अध्यक्ष काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या अंदोलनाला प्राध्यापकांची सूटा संघटना व राज्यातील शिक्षकेतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
या अंदोलनात, 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चीती मध्ये आश्वासित प्रगती मध्ये वगळलेल्या गे्रड पेचा समावेश असलेल्या स्केलला उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वित्त विभागाची मान्यता घेवून सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेच्या तरतुदी राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेत्तरांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून 7 व्या वेतन आयोगाचा लाभ मिळवून द्यावा अषी मागणी करण्यात आली होती. या अंदोलनाला, राज्यातील सोलापूर, वर्धा, रायगड यवतमाळ, बुलढाणा, कोल्हापूर, अमरावती, धुळे, नागपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, अहमदनगर, लातूर, नांदेड, ठाणे, पालघर, मुंबई, पूणे, वासिम अशा जिल्ह्यातील जवळजवळ 60 टक्के महाराष्ट्रातील शिक्षकेतरांनी या अंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
अंदोलन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष काॅम्रेड तानाजी ठोंबरे, काॅम्रेड ए. बी. कुलकर्णी, काॅम्रेड प्रविण मस्तुद, आरती रावळे, उमेश मदने, विलास कोठावळे, हणुमंत कारमकर, हरिदास बागल, दत्ता्त्रय पवार, गणेश कारंजकर, अमर कांबळे, सूधीर सेवकर, परमेश्वर पवार, अनिल वाघमारे, पांडूरंग भोंग, वर्धाचे मंगेश गिरडे, अकोल्यातील राजदत्त मानकर, रायगडचे पुरुषोत्तम शेट, बुलडाणाचे सुरेन्द्र हिवराळे, हरिकेशव देशमूख, संजय गाडेकर, पालघरचे बबन चैघूले, कोल्हापूरचे चलवा अंतेश्वर, लातूरचे आरून पाटील, नागपूरचे प्रकाश बैसारे, यवतमाळचे साहेबराव आरणी, अमरावतीचे जितेंद्र इंगळे, मनिष वानखेडे, लातूरचे भूजंगराव चलवा ,दिलीप उपासे, अन्वर खान, प्रभाकर कांबळे, प्रशांत सातपूते ,यांनी प्रयत्न केले आहेत.

Leave a Reply