Headlines

४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान | maharashtra cabinet expansion richest builder in india managal prabhat lodha with net worth of 44270 crore become ministers in Shinde Government scsg 91

[ad_1]

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ४० दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामधील एका नावाची विशेष चर्चा आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या या आमदाराची एकूण संपत्ती पाहून तुमचे डोळे नक्कीच पांढरे पडतील. कारण या आमदाराची एकूण संपत्ती आहे ४४ हजार २७० कोटी.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

एवढ्या संपत्तीचे मालक असणारे भाजपाचे हे आमदार मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदारही आहेत. या श्रीमंत आमदाराचे नाव आहे मंगलप्रभात लोढा. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष असणारे आमदार मंगलप्रभात लोढा हे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहेत. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या लोढा यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

नक्की वाचा >> “स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…”; शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पाहून सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करत नोंदवली प्रतिक्रिया

आज राजभवानमध्ये पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे.

नक्की वाचा >> “संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…”; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या

मुंबई, ठाण्यासहीत अनेक उपनगरांमध्ये गृहप्रकल्प उभारणारे लोढा बिल्डर्स म्हणून लोकप्रिय असणारे मंगलप्रभात लोढांची एकूण संपत्ती ४४ हजार २७० कोटी रुपये इतकी आहे. लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायिक आहेत.

नक्की वाचा >> अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमदार बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते? मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभेत केला खुलासा; म्हणाले, “तो मागे…”

जीआरओएचई हर्नूर इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट २०२० नुसार लोढा यांची एकूण संपत्ती ४४ हजार २७० कोटी इतकी आहे. लोढा यांच्या खालोखाल डीएचएफचे राजीव सिंघ यांचा श्रीमंत बांधकाम व्यवसायिकांच्या यादीत दुसरा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती ३६ हजार ४३० कोटी इतकी आहे. लोढा हे मागील पाच वर्षांपासून सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायीकांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहेत. २०२० मध्ये लोढा यांची संपत्ती ३९ टक्क्यांनी वाढली आहे. करोना कालावधीमध्ये सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या २०२० मधील बांधकाम व्यवसायातील कंपन्यांमध्ये लोढा ग्रुप अग्रस्थानी होता असं या अहवालात म्हटलंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *