Headlines

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सामील | 40 former Shiv Sena corporators from Kalyan Dombivali Municipal Corporation in Shinde group msr 87



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देणे सुरूच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड पडल्यानंतर व ६७ पैकी तब्बल ६४ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीतही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण, महापालिकेतील तब्बल ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

PHOTOS : शिवसेनेच्या हातून बालेकिल्ला निसटला?; ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक ‘शिंदे’शाहीत

या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, त्यांचा सत्कार करत आपला पाठिंबा दर्शवला आहे.

राज्यात सत्तांतर घडवून आणणाऱ्या बंडाळीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्के बसू लागले आहेत़ ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ , तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

ठाण्यात ६७ पैकी ६६ नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत; नरेश म्हस्केंची माहिती

ठाण्यात शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याने सेनेकडे केवळ एकच नगरसेवक आह़े खासदार राजन विचारे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका नंदिनी विचारे शिवसेनेबरोबर आहेत़ शिवसेनेने लोकसभेच्या मुख्य प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती नुकतीच केली़



Source link

Leave a Reply