Headlines

४ वर्षांच्या चिमुकल्याने गिळली बॅटली, १४ तासांनंतर….

[ad_1]

मुंबई : लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावं लागतं. लहान मुलांना प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं. हे कुतूहल कधी डोकेदुखी होईल काही सांगता येणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट हातात घेऊन ती उत्सुकतेने पाहण्याची त्यांची सवय असते. (4 years old boy swallowed battery ) आणि कुतूहल वाढताच ती गोष्ट कधी तोंडात घालतील. याचा काही नेम नसतो. 

असाच एक प्रकार ४ वर्षांच्या मुलीसोबत घडला आहे. या मुलाने चक्क खेळण्यातील बॅटरी पाहता पाहता तोंडात घातली. या घटनेने चक्क डॉक्टर देखील हादरले आहेत. 

मुलाने गिळली बॅटरी 

रेला हॉस्पिटलचे वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ आर रवी यांनी Zee मीडियाला सांगितले की,  चेन्नईमध्ये एका चार वर्षांच्या मुलाने पेन्सिलची बॅटरी गिळली. 

सुदैवाने, मुलाने लगेचच त्याच्या पालकांना याची माहिती दिली. मुलाने 5 सेमी लांबीची बॅटरी गिळल्याची माहिती समजल्यानंतर पालकांनी ताबडतोब डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

थोडा उशीर जीवावर बेतला 

घरी खेळत असताना रिमोट कंट्रोलमध्ये वापरलेली बॅटरी चुकून मुलाने गिळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलाच्या पोटात बॅटरी अडकल्याचे एक्स-रेमध्ये दिसून आले. 

एंडोस्कोपीद्वारे बॅटरी काढण्यात डॉक्टरांना यश आले. मुलाच्या पोटात अडकलेली बॅटरी काढण्यासाठी तब्बल 14 तास लागले आणि त्याचा जीव वाचू शकला. 

मुलाने 5 सेमी लांब आणि 1.5 सेमी रुंद बॅटरी गिळली होती. बॅटरी लहान मुलाच्या अन्न पाईप सारखी मोठी होती.

अथक प्रयत्नांनी डॉक्टरांनी वाचवला मुलाचा जीव 

एन्डोस्कोपी करूनही बॅटरी बाहेर काढणे अवघड होते. बॅटरी काढताना अंतर्गत अवयवांना इजा होण्याचा धोका होता. तसेच पोटात तयार होणाऱ्या ऍसिडमुळे बॅटरीला गंज येण्याचा धोका होता.

डॉक्टरांनी रोथ नेट वापरून एंडोस्कोपी करून संपूर्ण उपचार केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या नेटचा वापर करून विशिष्ट प्रकारच्या गाठीही काढता येतात.

मुलांच्याबाबतीत कायम सतर्क राहा 

पालकांनी मुलांप्रती काळजी घ्यावी याविषयी बोलताना डॉ.रवी म्हणाले की, मुले नकळत बटणे, नाणी, लहान बॅटरी अशा छोट्या छोट्या गोष्टी गिळतात.

अशा गोष्टी लहान मुलांपासून शक्यतो दूर ठेवाव्यात आणि फक्त मोठ्या आकाराची खेळणी मुलांना द्यावीत, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.

ते पुढे म्हणाले की, सुया, काचेचे तुकडे, चुंबक, औषधे विशेषतः लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावीत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *