Breaking News

31 जूलै 2020 पर्यंत वर्क फ्राॅम होम देण्याची मागणी

बार्शी  – आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर जिल्हा यांच्या वतिने  31 जूलै 2020 पर्यंत वर्क फ्राॅम होम देण्याची मागणी पु.आ.हो. सोलापूर विद्यापीठाचे मा. कुलगूरू यांना करण्यात आली आहे.  सध्या कोविड 19 आजाराचा विळखा वाढत असल्याने सरकारणे 31 जूलै 2020 पर्यंत लाॅक डाउन वाढवला आहे.  सोलापूर जिल्ह्यात कोविड 19 प्रादुर्भाव वाढत असल्याने, तर काहि माविद्यालये कोविड उपचारासाठी घेतली आहेत, ग्रामीण भागात आजार वाढत आहे, सध्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष कामाची उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही तरीही काही माहविद्यालयात प्राचार्य 100 टक्के शिक्षकेतरांची उपस्थिती सक्तीची करीत आहेत.  विद्यापीठाला याबाबत वर्क फ्राॅम होमचे परिपत्रक काढण्याची मागणी केली आहे.निवेदणावर अध्यक्ष काॅम्रेड तानाजी ठोंबरे, सचिव प्रविण मस्तुद, ए. बी. कुलकर्णी, आरती रावळे, उमेश मदने, हरिदास बागल, हणुमंत कारमकर, विलास कोठावळे यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!