26 नोव्हेंबर रोजी बार्शीत कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांचा संयुक्त भव्य निर्धार मोर्चा

बार्शी/अब्दुल शेख –बार्शी  तालुका कामगार संयुक्त कृती समिती व अखिल भारतीय किसान सभा, आयटक, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या पदाधिकाऱ्यांची  संयुक्त बैठक दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी आयटक कामगार केंद्र येथे कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशभर कामगार व शेतकरी, विद्यार्थी यांच्या विरोधात असणारे शासनाचे धोरण हाणून पाडण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2020 वार शुक्रवार रोजी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून भव्य निर्धार मोर्चा बार्शी मध्ये सनदशीर लोकशाही मार्गाने तसेच कोवीड महामारी चे सर्व नियम पाळत व दक्षता घेऊन काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आली. 

अधिक माहिती अशी की कामगारांनी लढून मिळवलेले कायदे केंद्र सरकार हाणून पाडत आहे, तसेच शेतकऱ्यांना कंपनीकरण्याच्या खाईत ढकलून देत आहे त्याचप्रमाणे केंद्रीय संयुक्त कामगार कृती समितीने केलेल्या मागण्या सोबतच वाढत्या वीज बिलाचा प्रश्न, शेतीचे नुकसान भरपाई प्रश्न,  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, घरेलू कामगार बोर्ड प्रश्न, बांधकाम कामगारांच्या मागण्या, महाविद्यालयीन शिक्षकेतरांच्या मागण्यात, लॉक डाऊन काळामध्ये बंद केलेल्या एनटीसीच्या मिल चालू करणे व इतर मागण्यां बाबत या बैठकीमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.  या मागण्या घेऊनच या निरर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  या मोर्चामध्ये पुरोगामी कामगार संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या बैठकीला अखिल भारतीय किसान सभा, आयटक संलग्न सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, घरेलू कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, इंटक प्रनित बार्शी टेक्स्टाईल मिल कामगार संघटना,वीज मंडळ वर्कर्स फेडरेशन यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड एबी कुलकर्णी, कॉम्रेड लक्ष्मण घाडगे, लहू आगलावे, भारत भोसले बाळासाहेब जगदाळे, सरवदे ताई, अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, बालाजी शितोळे, शाफीन बागवान, पवन आहिरे, भारत पवार, नागजी सोनवणे, प्रशांत पवार, नागनाथ गोसावी,विजय गलांडे, धनाजी पवार, ग्रामपंचायत कर्मचारी शौकत मुलानी आदी उपस्थित होते.

Leave a Reply