Headlines

राज्यात शिंदे सरकार! महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण आहेत?

[ad_1]

मुंबई : सत्तासंघर्षाला अखेर विराम लागण्याची चिन्हं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर असल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत. एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांना ‘मातोश्री’चे निष्ठावंत संबोधले जातं, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना झटका दिला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 50 आमदार आहेत. यात अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. हे एकनाथ शिंदे कोण आहेत त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल जाणून घेऊया. 

एकनाथ शिंदे (58) यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला आणि त्यांचे बालपण गरिबीत गेले. ते 16 वर्षांचे असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बराच काळ ऑटो रिक्षाही चालवली. याशिवाय पैसे मिळवण्यासाठी त्यांनी दारूच्या कारखान्यात काम केलं. 

1980 च्या रोजी त्यांच्यावर बाळ ठाकरेंचा खूप प्रभाव होता आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना प्रवेश केला. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांपर्यंत पोहोचणारा महाराष्ट्रात शिवसेना हा एकमेव पक्ष होता. 

1980 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 1970-80 च्या दशकातील महाराष्ट्रातील इतर तरुणांप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1980 च्या दशकात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि किसन नगरचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर होते.

2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत  

1997 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि 2004 पर्यंत ते या पदावर राहिले. 2004 मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 

2014 मध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले

एकनाथ शिंदे यांची 2005 साली शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *