Headlines

2020 नंतर – संधी आणि आव्हाने

सध्या सगळ जग कधी नव्हे ते थांबल. या महामारीच्या संकटातून आपण लवकरच बाहेर पडू नव्हे पडतो आहोत. पण, यातून बाहेर पडल्यानंतर आपल्या पुढे सगळ्यात मोठ काम असणार आहे ते म्हणजे गडबडलेली अर्थव्यवस्था आणि त्यात लपलेल्या  संधी .!
     
सध्या आपण बघतो आहोत की सगळेच क्षेत्र एकदम नीचांकी पातळीवर आले आहेत, आणि यातील जागतिक संधि शोधून सन २०२० पासून आपण पुन्हा नव्याने सुरवात करून जगाने ज्या ज्या संधि गमावल्या त्या आपण निर्माण करून सन २०२० च्या पुढे आपण नक्कीच महासत्तेकडे वाटचाल करू.
   
हीच बदलाची वेळ आहे, जर आपण यात संधि नाही शोधली तर बाकीचे आपल्याला ओलांडून पुढे जातील…! गरीबी व बेरोजगारी आपली वाढेल आणि आपल्या समाजाची स्थिति अत्यंत वाईट होइल. आणि जर आपण चांगली संधि निर्माण करून बदल केले तर आपण खरी प्रगती करू शकू. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडून गतिमान अर्थव्यवस्थेकडे, बेरोजगारितून रोजगारकडे, उद्योग विकासाकडे, गतिमान विकासाकडे…!!!
प्रामुख्याने आपण यापुढील काही लेखात उद्योग, सेवा, कृषि इत्यादि सारख्या विषयावर चर्चा करणार आहोत. तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान इत्यादि सारख्या व्यवसायात आपण फक्त सेवा क्षेत्रात आहोत, अजूनही आपण यासारख्या क्षेत्रात उत्पादक म्हणून नाही. कृषि, आरोग्य, खाण उद्योग, जैवविविधता, पायाभूत सुविधा, टाकाऊ पासून टिकाऊ, तंत्रज्ञान, राष्ट्रीय सुरक्षा, रसायने, शिक्षण इत्यादि सारख्या विषयावर चर्चा करणार आहोत.
                
यापैकी आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे, आणि यात प्रामुख्याने आपण कृषि प्रधान असल्याने, कृषि संबंधित काही गोष्टींचा विचार करायलाच हवा.
                
कृषिक्षेत्र आणि त्यासंबंधी जोडधंदे 

 या जागतिक महामारीच्या काळात आपल्याला प्रामुख्याने गरज पडली ती कृषि संबंधित गोष्टींची, भाज्या, फळे, अन्नधान्य इत्यादि गोष्टींची.  त्यामुळे बाकी सगळ जग थांबलं असताना आपण हे क्षेत्र नाही थांबऊ शकत. त्यामुळे या क्षेत्रात प्रामुख्याने लक्ष देण गरजेचं आहे.
                
आपण कृषि प्रधान असूनही अजूनही आपण अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात आयात करतो आहोत. तसेच आपली जमेची बाजू म्हणजे आपण जागतिक क्रमवारीत खूप वरच्या क्रमांकावर आहोत, यात प्रामुख्याने दूध, तांदूळ, कापूस, गहू, साखर इत्यादि पिकांचा समावेश होतो.
                
त्यामुळे या आणि यासारख्या पिकांची निर्यात वाढवण्यासाठी आपल्याला सिंचन, वीज, संशोधन, विकास आणि पायाभूत सुविधा तसेच हमिभाव या गोष्टींकडे लक्ष दिल पाहिजे. चिंतेची बाब म्हणजे कृषिक्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. कृषि क्षेत्रात जर हे बदल करू शकलो, या सुविधा निर्माण करू शकलो तर ग्रामीण भागातील गरीबी लवकर दूर होइल, आणि पर्यायाने कृषि आणि त्याच्या संबंधित क्षेत्रांचा विकास होइल.आणि हीच वेळ आहे पुन्हा नव्याने सुरवात करण्याची आणि जगाला दिशा देण्याची. फक्त यासाठी आपल्याला आपल्या काही चुका दुरूस्त करून तसेच दुसर्‍या देशाकडून पण चांगल्या गोष्टी शिकून घेण्याची.
                
कारण आर्थिक मंदीचा सगळ्यात मोठा फटका गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसतो. त्यामुळे गरीबीचे निर्मूलन आणि आर्थिक वृद्धी याकडे आपण लक्ष दिल पाहिजे.
                
आणि हीच वेळ शरणगतीची नसून बदलाची आहे, जुनी विचारसारणी झटकून नव्याने उभ राहण्याची आहे. आणि जर आपण चांगले बदल केले तरच आपण दुसर्‍या देशाला दिशा देऊ शकतो.
                
प्रत्यक्षात यासाठी खालील गोष्टी करता येऊ शकतात.
·       
  1.            जोडधंदा म्हणून खत निर्मिती, दुग्धउद्योग, शेळीपालन, कुकुटपालन, मस्यपालन, रेशीमउद्योग इत्यादि. यासाठी प्रोत्साहन,       अनुदान, योग्य अमलबजावणी .
  2.         कोरडवाहु शेती सिंचंनाच्या साधंनांचा वापर करून वलीताखाली आणणे, यामध्ये सौरपंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादि मार्ग वापरणे. यासाठी जन जागृती .
  3.          विजेची पूर्ण वेळ उपलब्धता ठेवणे.
  4.         कृषि व त्या संबंधित उद्योग धंद्याबद्दल सशोधन करण्यासाठी प्रोत्साहन, अनुदान, मानधन इत्यादि गोष्टी देणे.
  5.         आधुनिक तंत्रज्ञान वापरा संबंधी प्रशिक्षित करणे, प्रोत्साहन देणे.  
  6.          उत्पादित शेतमालाला योग्य हमीभव, निर्यात उपलब्ध करून देणे.

या आणि अशा सारख्या काही उपाय योजना सरकार, सामाजिक संघटना, नागरिक इत्यादि सगळ्या समाजघटकणी मिळून वापरल्या तर नक्कीच आपण पुन्हा नव्याने उद्योगात पाय रोऊन जगाला मार्गदर्शन करू.
                सर्वांगीण सर्वांसाठी आरोग्य …

या सध्याच्या महामारीच्या काळात या क्षेत्राची सगळ्यांना प्रामुख्याने आठवण झाली. नाहीतर सर्वच देशांकडे शत्रू राष्ट्राला नाष्ट करण्यासाठी दारूगोळा, अणुबॉम्ब इत्यादि गोष्टी आहेत, पण कोणत्याही राष्ट्राकडे आपल्याच देशातील नागरिकाना वाचवण्यासाठी पुरेशी दवाखाने, औषधे, उपकरणे, व्हेंटिलेटर्स नाहीत. आणि एखादी अशी महामारी आल्यानंतर आपल्याला आपल्याकडील सर्व आरोग्य सेवा कशा तुटपुंज्या ठरतात हे यातून दिसून आले. आणि आपल्याकडे तर हे क्षेत्र खूपच दुर्लक्षित राहिले आहे. बर्‍याच वेळा काही मोठ्या आजारासाठि दुसर्‍या देशावर अवलंबून राहावे लागले आहे. हे जरी खर असल तरी आपण पोलिओ, देवी, कॉलरा इत्यादि आजारावर मात केली आहे, तसेच मलेरिया, टिबी, एचआयव्ही इत्यादि नियंत्रणात आहेत.
                
सर्वांगीण आरोग्याचा विचार करता आपल्याकडे खेड्यापासुन माध्यम शहरे ते मोठ्या शहरापर्यंत विविध टप्पे आहेत. त्या सर्व टप्प्यावर आपल्याला लक्षं देण्याची गरज आहे.
सर्वात खाली तळाला प्राथमिक व उपप्राथमिक आयोग्य केंद्र आहे, ही केंद्र तालुक्यात तसेच काही गावात मिळून तयार केली जातात किंवा गावा गावात असतात. प्रामुख्याने ही सुसज्ज अद्ययावत करण्याची गरज आहे, म्हणजे ग्रामीण भागातील लोक तेथे उपचार घेऊ शकतील. यामध्ये डॉक्टरांची उपलब्धता आणि उपकरणांचा अभाव हेच प्रमुख कारण आहे, तसेच औषधांना शितपेटी देणे, नियमित विजपुर्वठ्याची सोय करणे.
                
त्यानंतर जिल्हाच्या ठिकाणी माध्यमिक आरोग्य केंद्र येथेही त्याच समस्यांना सामोरं जाव लागत. अत्याधुनिक उपकरणे वापरणे. त्या नंतर मोठी शहर, राजधानीची ठिकाण, इथ तातडीच्या सुविधा उपलब्ध करणे.सारख्या गोष्टीमध्ये लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.तसेच शासकीय कर्मचार्‍यांचा अभाव हे प्रामुख्याने याच काळात दिसून आले आहे.
  1.      या सर्व टप्प्यात शासनाकडून कमी किमतीतील औषधे ग्रामीण भागातील जनतेला उपलब्ध करून देणे. विविध चाचण्या       कमी किमतीत उपलब्ध करून देणे.
  2.     आत्याधुनिक उपकरणासाठी दवाखान्यांना अनुदान देणे.
  3.      संशोधनासाठी प्रवृत्त करणे, प्रोत्साहन देणे, मानधन देणे.
  4.    विमा सुरक्षा पुरवणे.
  5.    माहिती तंत्रज्ञानाचा आयोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर करणे.

शारीरिक आयोग्य याबरोबरच मानसिक आरोग्यकडे पण लक्ष दिल पाहिजे, त्यासाठी सामाजिक संघटना समजातील लोक यांना सोबत घेऊन कार्यक्रम आखणे, अमलबजावणी करणे.

यामधून आपण आरोग्य सेवा तर पुरवू शकतोच पण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती पण करू शकतो.
        
या लेखात आपण कृषि आणि त्या संबंधित उद्योग(जोडधंदे) तसेच सर्वांसाठी सर्वांगीण आरोग्य याची चर्चा केली, पुढील लेखात अशाच काही विषयावर चर्चा करू. (क्रमश::)
                   
ले.मयूर दत्तात्रय तिकटे 
मू.पो.कोरफळे ता.बार्शी जि.सोलापूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *