Headlines

IND vs NZ यांच्यातील पहिला T20 सामना मोफत पाहता येणार, कसे ते जाणून घ्या

[ad_1]

वेलिंग्टन : टी20 वर्ल्ड कपमधील पराभव विसरून टीम इंडिया (Team India) पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झाली आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध (India Vs New Zealand) तीन सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला टी20 सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार आहे, हे जाणून घेऊयात.  

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) वेलिंग्टनला पोहोचली आहे जिथे त्यांना न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टी20 मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला T20 सामना शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मासारख्या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण आपली जबाबदारी पार पाडणार आहेत.  

टीव्हीवर पाहता येणार? 

टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड (India Vs New Zealand) सामना टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. वेलिंग्टन येथे पार पडणारा मालिकेतील पहिला T20 सामना टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. याआधी हा सामना टिव्हीवर पाहता येणार नसल्याची बातमी समोर आली होती. मात्र सामना टीव्हीवर दाखवता येणार असल्याने फॅन्सना सुखद धक्का बसला आहे.  
 
जाणून घ्या सामना कधी आणि कुठे मोफत पाहता येणार : 

कुठे खेळवला जाणार?

भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील मालिकेतील पहिला टी-२० सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

किती वाजता पाहता येणार?

भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील पहिला T20 सामना 18 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12.00 वाजता खेळवला जाईल.

कुठे पाहता येणार?

डीडी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील पहिल्या T20 सामन्याच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकता. डीडी स्पोर्ट्सनेही ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. ट्विटनुसार, सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि डीडी स्पोर्ट्स वर प्रसारित केले जाईल.

टीम इंडिया टी-20 संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक

 न्यूझीलंड टी-20 संघ : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *