Breaking News

18 जुलै रोजी लॉकडाऊन विरुद्ध घरोघरी निषेध करा – अँड एम एच शेख

सोलापूर – 72 दिवसाचा लॉकडाऊन हा देशातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होता.या कालावधीत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना आणि यंत्रणा उभी न केल्यामुळे बाधितांची आणि मृतांची संख्या वाढतच आहे.या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार सर्वांना मोफत अन्नधान्य, आर्थिक मदत, आरोग्याच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले.मात्र त्याची योग्य  अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.उलट आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अतिरेक झाला. अनलॉक करून महिना उलटण्याच्या आधीच सरकार आपले अपयश लपवण्यासाठी, आणि जबाबदारी झटकण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.हे लॉकडाऊन फक्त प्रस्थापित आणि गलेलठ्ठ कमाई करण्याऱ्या व्यक्तींना लागू होते. सर्वसामान्य माणसे बेरोजगारी आणि उपासमारीने होरपळून जातील.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील 70 टक्के नागरिक लॉकडाऊनच्या विरोधात असताना सुद्धा प्रशासनाने जनता विरुद्ध लॉकडाऊन लादले. याला सर्व सोलापूरकरांनी 18 जुलै रोजी आपल्या घरासमोर निषेधाचे फलक दाखवुन एकदिलाने विरोध करून नागरिकांना होणाऱ्या हालअपेष्टांची जाणीव सरकार व प्रशासनाला करून देण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अँड एम एच शेख यांनी केले.  

मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा समितीची बैठक माकप चे राज्य सचिव ज्येष्ठ कामगार नेते कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी बोलताना खालील बाबीवर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, कोरोनाची जागतिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशातील केरळने आजवर कोरोनाची केलेला यशस्वी मुकाबला मर्मग्राही आहे.याबाबतीत भाजप च्या मोदी सरकारला आलेले दारुण अपयश तडकाफडकी आणि चुकीच्या पद्धतीने लादलेल्या लॉकडाऊनने शहरी आणि ग्रामीण अशा सर्व कष्टकरी वर्गावर लादलेल्या हालअपेष्टा अर्थव्यवस्थेची वाताहत लॉकडाऊन मध्ये मिळालेली देशाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची आलेली पण खाजगी क्षेत्राच्या भल्यासाठी वाया घालवलेली संधी , खाजगीकरणाचा सपाटा भाजप च्या नेतृत्वाने घडवले आहे.

आज देश वाचवण्याची गरज असताना असे उपद्रव हेतुपुरस्सर चालू आहेत. प्रथम देशवासीयांना उत्तम आरोग्य,  जीवन आणि रोजगार मिळवून देण्याची लढाई अधिक तीव्र करावे आणि टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा पवित्रा अधिक तीव्र करावे. सदर बैठकीत जिल्हा समिती सदस्यांसह सचिव मंडळ सदस्य,सिद्धप्पा कलशेट्टी, कुरमय्या म्हेत्रे, नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी,व्यंकटेश कोंगारी,युसूफ मेजर, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार,म.हानिफ सातखेड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!