15 डिसेंबर 2020 पर्यंत ची मतदार नोंदणी ग्रामपंचायत साठी ग्राह्य धरा

‘ मार्च 2020 नंतर ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांची मतदार नोदणी कोरोना महामारी मूळे होऊ शकलेली नाही त्यांची नोदणी 15 डिसेंबर 20 पर्यंत करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी 15 डिसेंबर पर्यंत ची नोदणी ग्राह्य धरावी असे न केल्यास आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत ‘ – कॉम्रेड पंकज चव्हाण ,जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष, उस्मानाबाद

उस्मानाबाद/प्रतिंनिधी- उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यासाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे, परंतु येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या विधान सभेसाठीची तसेच सप्टेंबर 2020 पर्यंत ची नोंदणीकृत गाव निहाय मतदार यादी आहे अंतिम राहिलं असा संदेश सोशल मीडियावर प्रसारित होताना दिसत आहे याला सत्य व अधिकृत दुजोरा जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने दिला आहे. याअगोदर ची मतदान नोदणी मार्च 2020 मध्ये करण्यात आली होती त्यानंतर त्यावेळी कोरोना महामारिमुळे मतदार नोदणी कार्यक्रम ऑफलाईन ही जल झाला नाही व ऑनलाईन करता आला नाही त्यामुळे अनेक नागरिक मतदार नोदणी करू शकलेले नाहीत तसेच अनेक नागरिक नव्यावे मतदार होण्यासाठी मार्च नंतर पात्र झालेले आहेत त्यामुळे जर सप्टेंबर 20 च्या यादी नुसार ग्रामपंचायत निवडणुका होणार असतील तर हजारो नवं मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत . नवमतदारांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी 15 डिसेंबर 2020 नंतरच ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होणार असल्याने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 डिसेंबर 2020 पर्यंतची मतदार नोंदणी ग्राह्य धरण्यात यावी या आशयाचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड पंकज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

Leave a Reply