Headlines

“१२ नाही आमच्यासोबत एकूण…”; शिवसेना खासदारांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत पोहचल्यानंतर मोठा गौप्यस्फोट | We have 18 MPs not just 12 Maharashtra CM Eknath Shinde on virtual meeting with Shiv Sena MPs scsg 91

[ad_1]

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांचाही मोठा गट बाहेर पडणार असल्याचं सोमवारी स्पष्ट झालं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे १२ खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच यासंदर्भात भाष्य करत महत्वाची माहिती दिली आहे. शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासादारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय. शिंदे आज शिवसेनेच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सर्व खासदार पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली असतानाच सोमवारी रात्री शिंदे सुद्धा दिल्लीत दाखल झाले. दिल्लीमध्ये पत्रकांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिलीय.

नक्की पाहा >> Photos: ‘मातोश्रीवर बोलवलं अन्…’, ‘बाळासाहेब असते तर..’, ‘हात जोडून विनंती केली पण…’; रामदास कदमांच्या हकालपट्टीचं कारण ठरलेलं पत्र

आधी आमदार आता खासदार…
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपाबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांमध्येही फूट पडली.

शिंदेंना बैठकीसंदर्भात प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले?
शिंदे गटाच्या बैठकीत जवळपास १२ खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावल्याची माहिती सोमवारी समोर आली. भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वप्रथम जाहीर मागणी करणारे राहुल शेवाळे यांच्याकडे शिंदे गटातील खासदारांचे गट नेतेपद देण्यात येईल अशी चर्चा आहे. विनायक राऊत, अरिवद सावंत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे हे सहा खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे सांगण्यात आले.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

मात्र मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेचे खासदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे का याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी हसून, “शिवसेनेचे खासदार आमच्यासोबत येतील. आमच्यासोबत १२ नाही तर एकूण १८ खासदार आहेत,” असा दावा केलाय.

शिवसेनेच्या बैठकीला पाच खासदार
शिवसेनेचे १२ बंडखोर खासदार शिंदे गटातील बैठकीत सहभागी झाल्याचे कळताच सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. लोकसभेतील खासदार गजाजन कीर्तीकर दिल्लीत आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील पाच खासदारांनी बैठकीला हजेरी लावली. अन्य १२ खासदार गैरहजर राहिल्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर फूट पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र आता शिंदे यांनी या १२ खासदारांबरोबरच अन्य ६ खासदारही आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय.

नक्की पाहा >> Video: “तुम्ही मला…”; गुवाहाटीचा उल्लेख करत चिमुकलीने अशी काही मागणी केली की मुख्यमंत्री शिंदे नि:शब्द झाले अन्…

उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
खासदारांमध्ये फूट पाडून शिंदे गटाने शिवसेनेला दुसरा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचेही लक्ष असेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *