Headlines

गोव्यात काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपाच्या वाटेवर? चर्चांना उधाण; काँग्रेस पक्षाने दिलं स्पष्टीकरण

[ad_1]

गोव्यात काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या अफवा असून आमचा कोणताही आमदार भाजपाच्या वाटेवर नसल्याचे गोवा काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा- शिंदे आणि उद्धव ठाकरेंना धक्का! विधिमंडळ सचिवांकडून आदित्य ठाकरे वगळता सर्व ५३ आमदारांना नोटीस

पावसाळी अधिवेशनावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन

काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपाच्या संपर्कात असून या मंत्र्यांनी भाजपाकडे तीन कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केल्याच्या चर्चा सुरु होत्या. गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव हे या आमदारांची समजूत काढत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या सगळ्या अफवा असून येत्या पावसाळी अधिवेशनावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- ‘विठ्ठ्ल विठ्ठल’ म्हणत संजय राऊतांनी ट्वीट केला खास फोटो

काँग्रेस आमदारांमध्ये एकी

ऑक्टोबर २०१९ मध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. कवळेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. सध्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो इतर पाच आमदारांसोबत पक्षांतर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चर्चेत होते. लोबो अगोदर भाजपामध्ये होते. मात्र, निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण लोबो यांच्या पुन्हा पक्षांतक करण्याच्या चर्चा अफवा असल्याचे काँग्रेस गोवा अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आमदारांमध्ये एकी असून या सगळ्या अफवा असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *