100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारणार “ही ” अभिनेत्री

दिल्ली/वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटकाळी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी लोकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.ती दिल्लीमध्ये 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारणार आहे.

कोरोना ने देशभर हाहाकार माजलेला आहे. या कठीण काळात अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. हुमा कुरेशी ही लोकांच्या मदतीसाठी पुढ आली आहे. उमा एका स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून दिल्लीमध्ये शंभर बेडचे हॉस्पिटल बनविणार आहे. हुमा कुरेशी ने ग्लोबल चाइल्ड राईट्स ऑर्गनायझेशन सेव द चिल्ड्रन सोबत हातमिळवणी केली आहे. या संस्थेच्या सोबत मिळून हुमा दिल्लीमध्ये अस्थायी स्वरूपात हॉस्पिटल उभा करण्यामध्ये लागली आहे. ह्या दवाखान्यामध्ये 100 बेड व एक ऑक्सीजन प्लांट असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत घरीच उपचार सुरू असलेल्या धोरणाचा रुग्णांना मेडिकल किट दिल्या जाणार आहेत.

हुमा कुरेशी ने एक व्हिडिओ शेअर करून लोकांना दान करण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये हो म्हणाली की तुमच्या सगळ्या सारखं ह्या दुसऱ्या कोरोना मीही दुःखी आहे घाबरलेले आहे. ही वेळ एक दुसऱ्यांची मदत करण्याची वेळ आहे. मी सेव्ह द चिल्ड्रन च्या सोबत हातमिळवणी केली आहे. जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे आमच्या राजधानीला मदतीची आवश्यकता आहे. मागील काही आठवड्यापासून मी सेव्ह द चिल्ड्रन सोबत मिळून एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे.

आम्ही प्रत्येक शहरात 100 बेडचे कोविड फेसिलिटी बनवायचा चे प्लॅनिंग करत आहोत. या फेसिलिटी मधे अनुभवी मेडिकल प्रोफेशनल्स औषधे आणि ऑक्सीजन प्लांट असेल. जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत अशांसाठी आम्ही बीड केअर किट च्या सोबत टेली कन्सल्टेशन आम्ही तर काही गोष्टी जाणार आहोत. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी मदत केली आहे आता आम्हाला आपली गरज आहे. प्रत्येक मदत एक जीव वाचू शकतो कोणतेही दान कधीच लहान नसतं. ह्यामुळे मी आपणास विनंती करते की आमची आणि एक दुसऱ्यांची मदत करा.

Leave a Reply