Headlines

लोकमंगल महाविद्यालयांकडून दिली जाणार एक लाखाची शिष्‍यवृत्ती

वडाळा: लोकमंगल जूनियर कॉलेज आणि सायन्स अकॅडमी यांच्यावतीने पायाभूत अभ्यासक्रमाची अंमलबजावणी जून महिन्यामध्ये करण्यात आलेली होती. अभ्यासक्रमास जवळपास साडे सहाशे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते. दररोज 40 मिनिटांचे चार तास फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथेमॅटिक्स या पद्धतीने झूम ॲपच्या माध्यमातून लेक्चर घेण्यात आले. तसेच आठवड्यातून एकदा दर शनिवारी अभ्यागत प्राध्यापकांचे चार विशेष मार्गदर्शन सत्रे राबविण्यात आली. दररोज घरचा अभ्यास डेली प्रॅक्टिस पेपर आठवड्यातून एक चाचणी परीक्षा अशा पद्धतीने फाउंडेशन अभ्यासक्रम राबविण्यात आलेला आहे. याच धर्तीवर लोकमंगल महाविद्यालय दिनांक 5 जुलै 2021रोजी दोन सत्रांमध्ये म्हणजेच सकाळी 10 ते 11 आणि दुपारी चार ते पाच या वेळेत 100 गुणांची ऑनलाइन परीक्षा शिष्यवृत्ती करता होणार आहे. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि चाळीस प्रश्नांची असेल. या परीक्षेकरता दहावीचा विज्ञान आणि गणिताचा अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाईल. जागतिक स्पर्धेमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले हुशार होतकरू मुले शैक्षणिक विकासापासून वंचित राहू नयेत. हा या परीक्षेचा हेतू आहे . सदर परीक्षेत उच्च गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या नियमानुसार पुढील शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. परंतु त्यासाठी संस्थेच्या नियम व शर्तींचे पालन करणे अनिवार्य असेल. सदर परीक्षा ही नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्म या ॲपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत दिलीप धारूरकर यांनी केले आहे. याकरिता 7507776814 या क्रमांकावर ती संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply