ह्युमन राईट्स अँड लॉ डिफेंडर्स च्या जिल्हा प्रतिनिधी पदी मनीष देशपांडे यांची निवड

मानवी हक्काचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व कायद्याच्या दृष्टिकोनातून न्याय मिळवून देणाऱ्या संस्थेने माझी जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड केली ही फार आनंदाची व जबाबदारीची बाब आहे. समाजभान बाळगत असलेल्या वकिलांना एकत्र घेऊन काम करण्याचा मी प्रयत्न करीन. या संस्थेच्या माध्यमातून मोठे काम करण्याची संधी मला मिळाली आहे. यासाठी मी ऍड. असीम सरोदे यांचा आभारी आहे – मनीष देशपांडे

बार्शी-सहयोग ट्रस्ट, पुणे अंतर्गत स्थापित कायदेविषयक शाखा ‘ह्युमन राईट्स अँड लॉ डिफेंडर्स(एच.आर.एल.डी)’ ही मानावाधिकारांच्या प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. ह्युमन राईट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या माध्यमातून महिला, बालक, एच.आय.व्ही/एड्स ग्रस्त, अपंग, अंडर ट्रायल कैदी व इतर शोषित, पीडित समूहांच्या मानावाधिकारांसाठी काम होत आहे. या समूहांना मोफत कायदेविषयक सल्ला देऊन त्यांचे प्रश्न न्यायिक मार्गाने सोडविण्यात एच.आर.एल.डी यशस्वी ठरली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दुर्लक्षित घटकांच्या मानावाधिकारांचे प्रश्न समजून घेऊन न्यायिक मार्गाने ते सोडविण्यात मदत करण्यासाठी सहयोग ट्रस्टचे ऍड. असीम सरोदे यांनी मनीष देशपांडे यांची निवड केली आहे. मनीष देशपांडे यांची मानावाधिकारांच्या प्रश्नांबद्दल असलेली जाणीव व काम करण्याच्या प्रबळ इच्छेमुळे त्यांची या पदी निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply