हातचा खरीप गेलेल्या शेतकऱ्यांना शिवार हेल्पलाइनची साथ -सात दिवसांत 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना समुपदेशन


शिवार हेल्पलाइनमुळे मला ऍप मध्ये माहिती कशी भरायची याचे मार्गदर्शन मिळाले व मानसिक आधार ही दिला गेला, त्यातून मी समाधानी आहे. -कल्याण नारायण कंकाळ , शेतकरी . रा. चोराखळी ता. कळंब

उस्मानाबाद:-जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली व त्यातून पिकाचे प्रचंड नुकसान झाले.पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद व विमा कंपनी यांच्याकडून करण्यात आले. यानंतर लगेच शिवार हेल्पलाइन कडे फोन येऊ लागले. यामध्ये सर्वाधिक कॉल उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, उमरगा तालुक्यातून आहेत.
येणाऱ्या फोन वरून असे लक्षात आले की, पिक विमा अँप वापरण्यात शेतकऱ्यांना असंख्य तांत्रिक अडचणी येत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ “शिवार संसदने” एक छोटासा मार्गदर्शन पर व्हिडिओ तयार करून जिल्ह्यातील समाज माध्यमावर प्रसारित केला गेला. याच्यातून ऍप मध्ये माहिती कशी भरायची हे अगदी सोप्या भाषेत सांगितले गेले. फोन आल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य त्या यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, हतबल शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात आला. त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.
शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.
यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, परिवर्तन ट्रस्ट,तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद, बायर प्रयास असोसिएशन , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply