Headlines

स्मशानभुमीचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी

बार्शी /प्रतिनिधी- जोपर्यंत दफन भुमीसाठी जागा मिळत नाही तो पर्यंत मयत व्यक्तीचा दफन विधी करणार नाही. अशी आक्रमक भुमिका तांदुळवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली होती. यानंतर उप-जिल्हाधिकारी (पूनर्वसन ) विभाग मोहिनी चव्हाण, बोरी मध्यम प्रकल्प(पूनर्वसन)डेप्युटी इंजिनिअर झोल ए.एस. यांनी घटनास्थळी भेट दिली. मौजे. तांदुळवाडी येथील गट नं. 14 मध्ये पाहणी करून गट नं. 14 च्या दक्षिण बाजुला क्षेत्र 20 आर सर्व सामाजासाठी स्मशानभुमीसाठी/दफनभुमीसाठी जागा देण्यात आली.

अधिक माहिती पुढील प्रमाणे तांदुळवाडी येथील हजरत गुलाब शेख (वय-51 वर्षे) यांचे दि.30 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता निधन झाले. मौजे तांदुळवाडी गाव हे ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पामुळे पूनर्वसित झालेले आहे. गावात अद्दयाप पर्यंत दफनभुमीसाठी जागा उपलब्ध नव्हती या कारणाने गावातील ग्रामस्थांनी जोपर्यंत दफनविधीसाठी जागा मिळत नाही, तोपर्यंत मयत व्यक्तीचा दफनविधी/अंत्यसंस्कार करणार नाही. अशी भुमिका घेतली होती.

त्यानंतर तांदुळवाडी येथे उप-जिल्हाधिकारी (पूनर्वसन) विभाग मोहिनी चव्हाण, बोरी मध्यम प्रकल्प(पूनर्वसन)डेप्युटी इंजिनिअर झोल ए.एस. तसेच बार्शी तहसिलदार सुनिल शेरखाने, नायब तहसिलदार संजिवन मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांगरी सुधीर तोरडमल, सरपंच राजेंद्र गरड, मंडळ अधिकारी दराडे मॅडम, तलाटी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तांदुळवाडी येथील गट नं. 14 मध्ये जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी उप-विभागीय अधिकारी (पूनर्वसन कार्यालय) सोलापूर यांच्या सूचनेनुसार पंचनामा करण्यात आला. त्यानुसार गट नं. 14 च्या दक्षिण बाजूला क्षेत्र 20 आर सर सामाजासाठी स्मशानभुमीसाठी/दफनभुमीसाठी व शिल्लक असलेले गट नं.14 ची मोजणी झाल्यानंतर उर्वरित क्षेत्र 63 आर हस्तांतरीत केले जाईल. कायदा व सुव्यव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. हा पंचनामा मंडळ अधिकारी नारी मंडळ, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच राजेंद्र गरड, हारुण शेख, मुजाहिद शेख, सचिन गरड, उमाकांत आगलावे, लालासाहेब शेख, समीर शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या चर्चेच्यावेळी बिलाल शेख, शरीफ शेख, मैनुद्दीन शेख, जमील खान, आयुब शेख, शकील मुलाणी, शब्बीर वस्ताद, इन्नुस शेख, मुसा मुलाणी, मुन्ना बागवान, सर्फराज सय्यद, मोहसिन मलिक उपस्थित होते. सर्व घटनेनंतर व पूनर्वसन विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर मयत हजरत शेख यांच्यावर विधीवत दफनविधी करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *