Headlines

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कोव्हिड योद्धे पगारापासून वंचित

सोलापुर /अब्दुल शेख – सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचारी पगार दिला गेला नाही , या  विषयाला घेऊन महाराष्ट्र राज्य जि.प आरोग्य सेवा कर्मचारी संघ संघटना आक्रमक झाली आहे . संघटनेकडून मा. जिल्हाधिकारी ,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी  सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांचे वेतन मागिल्ब 10 महिन्यांपासून वेळेवर होत नाही. आरोग्य कर्मचार्‍यांना वेतांनाशिवाय दूसरा कोणता उतपन्न स्त्रोत नाही.बँकांचे गृह कर्जाचे हफ्ते ,पत संस्थेचे हफ्ते वेळेवर न गेल्यास व्याज ,चेन बौन्स ई.मुळे कर्मचार्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व संवर्गाच्या नियमित पदौन्नती गेल्या तीन वर्षापासून रखडलेली आहे. काही कर्मचार्‍यांचे 6 व्या वेतन आयोगाचे हफ्ते अद्याप फंडात जमा झाले नाहीत. वरील सर्व मागण्या चर्चे अंती लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्या. अन्यथा संसदीय मार्गाचा अवलंब करून आंदोलन ,उपोषण करावे लागेल ,असा इशारा निवेदांनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस विजया चव्हाण ,गोपाल शिंदे , चंद्र्कांत पवार ,अध्यक्ष मिलिंद गणफुले,उपाध्यक्ष शिवाजी कांबळे ,, कोशाध्यक्ष बाबा काळजे ,विभागीय अध्यक्षा विजया राऊत यांच्या सह्या आहेत.  

One thought on “सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कोव्हिड योद्धे पगारापासून वंचित

  1. आपण जनते साठी जे पत्रकारितेच्या स्वरूपातून जे कार्य करता ते खरंच उल्लेखनीय आहे.
    तुमचे असेच काम चालत राहूद्या आम्ही तुमच्या बरोबर आहे. 🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *