Headlines

सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांची होणारी लूट तात्काळ बंद करा – एसएफआय

सोलापूर / शाम आडम – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांची एजंटांकडून होणारी लूट  तात्काळ बंद करा या मागणीला घेऊन उपजिल्हाधिकारी माननीय अजित देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

सेतू कार्यालयात शिक्षणासाठी लागणारे विविध दाखले काढण्यासाठी शिक्षित व अशिक्षित पालक आपल्या पाल्यांना घेऊन येत असतात. पण येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास व पालकास  कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही. आणि त्यांना तुच्छ भाषा वापरून बाहेर हाकलले जात आहे. पण त्या ठिकाणी अनेक एजंट कार्यालय परिसरात उभारलेले व बसलेल्या असतात त्यांना मात्र काडीचाही शब्द सेतू कर्मचारी व तेथील अधिकारी बोलत नाही.

सेतू कार्यालयातून मिळणारे दाखले उत्पन्न व  रहिवासी हे दाखले वेळेवर सह्या होऊन मिळत आहेत. पण जातीचे व नॉन क्रिमिलियर हे दाखले मात्र एक ते दीड महिन्यापासून पेंडिंग आहेत. सह्या करून पुढे पाठविण्यात आले नाहीत. का सह्या झाले नाहीत याचा ही उत्तर त्यांच्याकडे  नाही.

सध्या दहावी व बारावी परीक्षा निकाल जाहीर झाला असून पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक कॉलेजने आपला प्रवेश फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरून घेत आहेत. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्र (दाखले) सेतू कार्यालयातून वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.  आधीच कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थी सहा महिन्यापासून घरीच बसून आहेत.

 सेतू कार्यालयातून मिळणारे विविध प्रकारचे दाखले तात्काळ विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. सेतू कार्यालय कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना व पालकांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे. सेतू कार्यालयात एजंटगिरी बंद करा. सेतू  कार्यालयाच्या परिसरात दिसणाऱ्या एजंटांवर खडक कारवाई करा. या सर्व मागण्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आले.

यावेळी एफएसआय जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी जिल्हा सहसचिव शामसुंदर आडम, माजी सचिवा मीरा कांबळे, जि. क. सदस्य अश्विनी मामड्याल, कृष्णा आडम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *