Headlines

सिने अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर



नवी दिल्ली /वृतसंस्था -कला क्षेत्रातील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सिने अभिनेता   रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला. गुरुवारी सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना दिल्याचे जाहीर केले. 3 मे ला होणार्‍या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण कार्यक्रमात राजनीकांत  यांना हा पुरस्कार दिला जाईल

सुचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की ,आम्हाला हे सांगताना आनंद होतोय की2019 साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महान कलाकारा पैकी एक रजनीकांत यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. पटकथा लेखन , निर्माता तसेच अभिनेता म्हणून त्याचे सिनेमा क्षेत्रात्तील  योगदान आहे.

पुढे ते म्हणाले की रजनीकांत असे अभिनेते आहेत ज्यांची 50 पेक्षा अधिक वर्ष भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याचा 1992 ला प्रदर्शित अन्नामलाई  हा माझा रजनीकांत यांचा सर्वात आवडता चित्रपट आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *