Headlines

सिंदखेड राजा तालुक्यात वादळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान

सिंदखेड राजा/गजानन आघाव –  सिंदखेड राजा परिसरात दि.20/09/2020 रोजी रात्रीच्या वादळी पावसाने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला असून त्याचे एक उदाहरण म्हणून सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे पळसखेड चक्का शिवारातील शेतकऱ्यांचे कपाशी, फळबाग , मिरची, सोयाबीन अशी अनेक पिके मातीत गेली.पळसखेड चक्का शिवारातील गट नंबर 56 मधील नामे दत्तात्रय विठोबा मुंढे यांच्या शेतातील कपाशीची  व फळबागाची  झालेली अवस्था बघून सरकारने याचे तातडीने  पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *