Headlines

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फकिरा बॉईजच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

पंढरपूर /रविशंकर जमदाडे – पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.तसेच प्रतिमेचे पूजन जेष्ठ नेते बाळासो (काका)यादव-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये अमोल दादा पाटोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच जयंतीचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या दहावी-बारावी निकालामध्ये प्रथम क्रमांक १)कु.पिसे प्रिती धनाजी[८८.६०%] ,द्वितीय क्रमांक २) कु. पिसे प्रतिक्षा नाथा[ ८७.८०%] ,तृतीय क्रमांक ३) सुतार साहिल सतिश [८७.४०%]
 तसेच मागासवर्गीयांमध्ये प्रथम क्रमांक कु. पाटोळे अनिता किसन [ ८१.००%] व इयत्ता बारावी मागासवर्गीयांमध्ये प्रथम क्रमांक सातपुते आदित्य आप्पा [ ६९.००] या सर्व मानकऱ्यांचे पष्पुहार देऊन गौरव करण्यात आला.त्याच्या  भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच प्रसंगी उपस्थित प्रकाश रामचंद्र रणदिवे,लखन रणदिवे, वैभव रणदिवे,अभिषेक रणदिवे, संभाजी रणदिवे,पंपू पाटोळे,आप्पा सातपुते,बेबा सातपुते, अभिजित यादव, शिवाजी रणदिवे, महावीर कांबळे,दाजी सातपुते, भावेश गायकवाड,रवि रणदिवे (सर), आवेश माने, संतोष पाटोळे, आणि फकिरा बॉईजचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सातपुते तर आभार प्रदर्शन अमर पाटोळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *