सांगली जिल्हा बंदला उत्सूर्फ प्रतिसाद


सांगली/सुहेल सय्यद-दि 8 डिसेंबर 2020 रोजी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्हात शहरी व ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.ग्रामीण भागात कवठे एकंद, नागाव, बिसुर, नांद्रे, या ठिकाणी गावाच्या मुख्य रस्त्यातून शांततेत मोर्चा काढून निषेध वेक्त केला. या वेळी विविध पक्षाचे प्रतिनिधी व मोठ्या प्रमाणे शेतकरी उपस्थित होते.

सांगली शहरातील स्टेशन चौकातून रॅलीला सुरुवात झाली शहराच्या मुख्य रस्त्यावरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये व्यापाऱ्यांना स्वयंपूतीने बंद मध्ये सहभाग घेतला. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना, प्रहार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, व इतर राजकीय पक्ष. व हॉटेल चालक संघटना, सर्व व्यापारी संघटना व शेतकरी संघटना, व सामाजिक संघटना या मधे सहभागी झाले. शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष महेश कराडे, मुस्लिम अधिकार आंदोलन महाराष्ट्र चे अध्यक्ष मुनीर मुल्ला, मराठा सेवा संघ चे डॉक्टर संजय पाटील, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख, राहुल पाटील, लालू मेस्त्री, दिगंबर माळी यावेळी किसनबाग समन्वय समितीचे प्रमुख कार्यकर्ते, शेतकरी, रॅलीमध्ये सहभाग होते.

Leave a Reply