Headlines

“सांगलीमध्ये अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न.”


सांगली/सुहेल सय्यद           

   सांगलीमध्ये नुकतीच अल्पसंख्यांकांची संविधानिक हक्क व अधिकार या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली, या कार्यशाळेचे आयोजन अल्पसंख्यांक कल्याण समन्वय समिती, सांगली शाखेतर्फे करण्यात आले होते. 

           कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून संविधानाचे अभ्यासक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. विनोद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमचे अध्यक्ष झाकीर भाई शिकलगार हे लाभले.

              संविधानाची प्रस्तावना वाचून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली; यावेळी बोलताना डॉक्टर विनोद पवार म्हणाले, भारतीय संविधानाच्या कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांना मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत, या अधिकारांचा वापर करून अल्पसंख्यांक समाजाने त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास साधून घेतला पाहिजे. आज संविधानाच्या मूल्यावर घाला घालण्याचे काम काही जातीयवादी संघटना करीत आहेत. अशावेळी अल्पसंख्यांकांनी आपले संविधानिक  हक्क व अधिकार जाणून घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी केंद्र व राज्य सरकारांच्या योजनांची माहिती घेऊन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत त्या पोहोचवाव्यात. 

                मायनॉरिटी एन.जी.ओ. फोरमचे झाकीर भाई शिकलगार बोलताना म्हणाले  की सध्या केंद्र व राज्य सरकारच्या अल्पसंख्याकांसाठी फारच कमी योजना लागू आहेत व बऱ्याच योजनांची राजकिय नेत्यांकडून नुसतीच घोषणा होते परंतु प्रत्यक्षात त्या योजना सुरू होत नाहीत.ज्या योजना सुरू आहेत त्याला सरकार कडून अतिशय अपुरा निधी दिला जातो त्यामुळे त्याचा लाभ मोजक्याच लोकांना होतो या साठी सर्व अल्पसंख्यांक समाजातील लोकांनी आपापसातील मतभेद विसरून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

              मुनीर मुल्ला यांनी उपस्थितांचे स्वागत केले, प्रवीण नवगिरे यांनी प्रास्ताविक मांडले, याकुब मणेर यांनी सूत्र संचलन केले व आभार प्रदर्शन सौ. जसबिर कौर खंगूरा यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे सुनील फराटे, मुस्लिम समाजाचे मुफ्ती मुजम्मील, फादर नवगीरे, रोहित माळी, सलीम तेरदळाकर, ताहीर शेख, सुहेल सय्यद, जिशान पटेल, रमिज मणेर, सरताज तांबोळी, समीर मुजावर, मुनीर शिकलगार व इतर अल्पसंख्यांक समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *