Headlines

सरपंचांनी दिली कोरोना रुग्णांसाठी मोफत गाडी , संघटनेने केला सत्कार



सरपंच परिषद राज्यातील सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील – अँड विकास जाधव प्रदेश सरचिटणीस

बार्शी/प्रतिनिधी – सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने सरपंच परिषदेचे सरचिटणीस अँड विकास जाधव यांच्या हस्ते तसेच रस्तापुरचे सरपंच दादासाहेब बरबडे,उंबर्गेचे सरपंच दादासाहेब विधाते यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील मांडेगाव ग्रामपंचायत मध्ये जाऊन मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे यांना कोरोनाच्या काळात स्वतःची गाडी कोरोना रुग्णासाठी मोफत रुग्णवाहिका म्हणून दिल्या बद्दल तसेच मागील वर्षी पासून कोरोनाचा गावात सिरकाव होवू नये म्हणून अतिशय प्रभावी काम केले होते ग्रामविकासात नाविण्यपूर्व व यशस्वी कार्यबदल आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ग्रामसेवक प्रमोद बाबर,ग्रा, सदस्य बंडू दळवी,तानाजी मिरगणे, विष्णु मिरगणे यांचा सह ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच परिषद प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष अनिल गिते, सरचिटणीस अँड विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरपंचाचा मानसन्मान वाढवण्यासाठी तसेच आदर्श निर्माण करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरपंच परिषद राज्यात काम करत आहे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदिनाथ देशमुख महिला जिल्हा अध्यक्ष कविता घोडके पाटील यांनी बार्शी तालुक्यातील आदर्श सरपंच म्हणून पंडित मिरगणे यांची निवड केली कोरोना प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे गावात जावून मोजक्या पदाधिकार्याच्या उपस्थितीत सदरील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अशाचप्रकारे सर्व तालुक्यातील एक आदर्श सरपंच निवड करण्यात येईल असे सरचिटणीस अँड विकास जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply