Headlines

सततच्या पावसाने शेतजमीचे नुकसान


पळसखेड चक्का येथील सतत मुसळधार पाऊस झाल्यामुळे या शिवारातील छोटे-मोठे पाझर तलाव तसेच माती बांध व सिमेंट बांध पूर्ण वरफुल झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन पूर्णपणे चीभरडेली आहे.



सिंद्खेड राजा /बालाजी सोसे -सतत पावसामुळे या पळसखेड चक्का परिसरातील संपूर्ण माती बांध, पाझर तलाव ,सिमेंट बांध पूर्णपणे वरफुल झाल्यामुळे या परिसरामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे या गावातील 50 टक्के जमीन आज रोजी चिभडली आहे असाच पाऊस राहिल्यास संपूर्ण महाकाळ होईल जमीन पूर्णपणे चिभरडेली म्हणजे पाण्याखाली गेलीआहे परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांना आता काय करावं हे सुचत नाही त्यामुळे किनगाव राजा, पिंपळगाव लेंडी, शेलगाव राऊत, उंब्रज नरसिंह ,उगला,सावखेड तेजन .संपूर्ण परिसर वोला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे मूग गेला, उडीद गेला ,कपाशी गेली ,सोयाबीन गेली हाती काही नाही राहिलं आता फक्त सरकार मायबापांनी शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे सरसगट संपूर्ण पंचनामा करून थेट शेतकऱ्याला मदत द्यावी .अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे.

Leave a Reply