संवेदनशील नागरिक घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित लोकशाहीचे शिक्षण हि काळाची गरज : प्राचार्य श्रीकांत धारूरकर

वडाळा : श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्टान संचलित लोकमंगल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय वडाळा या शिक्षण संकुलाच्यावतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. सादर कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झूम वरून घेण्यात आला . प्रारंभी अजय व विजय कांबळे या दोन दुसऱ्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भीमगीते सादर करून सहभाग नोंदविला होता. सादर कार्यक्रम हा विद्यार्थी पालक शिक्षक समाजातील इतर सर्व घटक यांच्याकरिता खुला होता. सौ क्षीरसागर प्रियांका मॅडम यांनी चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया माझं भीमराया हे भीमगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. लोकमंगल इंग्लिश मिडीयम स्कूल चे विदयार्थी प्रियांका माळी आर्या पवार आणि प्रिया बनसोडे या विदयार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. अजय कांबळे आणि विजय कांबळे या दोन मुलांनी भीमगीते गायली. या कार्यक्रमात शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत धारूरकर हे उपस्थित होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य धारूरकर म्हणाले कि आजच्या मुलांना सजग आणि संवेदनशील नागरिक बनवायचे असेल तर विद्यर्थ्यांमध्ये वैज्ञनिक दृष्टीकोण , लोकशाहीचे मूल्ये , स्त्री पुरूष समानता , राष्ट्र उभारणीचा विचार रुजविणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. डॉ बाबासाहेबानी अस्पृश्यता निर्मूलन , चातुर्वर्ण व्यवस्था , सामाजिक समस्येचे निराकारण तळागाळातील लोकांसमवेत जाऊन जाणीव करून घेऊन केले. आज मितीस समाजातील समस्या सोडविण्यासाठी आंबेडकरी विचार हे समाजाला प्रेरणादायी असे आहेत असे मत त्याची व्यक्त केले. बाबासाहेसाबांचे शिक्षणाबद्दलची तळमळ , दलितांचा उद्धार करण्यासाठीची क्रांतीकारी चळवळ , चवदार तळे असेल किंवा इंग्रजी जुलमी राजवट उलथवण्याचा प्रयत्न सर्वच क्षेत्रात बाबासाहेब हे अग्रणी होते. महामानवाने संविधान या देशास दिले आणि समता बंधुता लोकशाही , शिक्षण न्याय हक्क या सर्वांची जाणीव भारतीयांना झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष याना अभिवादन असे प्रतिपादन प्राचार्यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अश्विनी टोणपे , दीपाली शिंदे , प्रज्ञा होनमुठे , राधिका घाटगे , नंदकुमर स्वामी प्रशांत झुंजा गणेश गायकवाड अमितकुमार आर डी स्वामी इंद्रजित चव्हाण आदींनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन दीपाली शिंदे आणि नफिसा तांबोळी यांनी केले.

Leave a Reply