Headlines

संविधान आणि संविधान मधील मूलभूत अधिकार सोप्या शब्दात समजावून सांगणारे त्यामधील अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे मानवाधिकार वकील असीम सरोदे

संविधान हे किती महत्वाचे आहे, संविधान अनुच्छेद कुठले, कुठे आणि कसे ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि भविष्यासाठी कसे वापरता येतात हे आपल्या दैनंदिन जीवनाच्या उदाहरणावरून सामान्य माणसाला तसेच शिक्षण न झालेल्या माणसाला सुद्धा सोप्या पद्धतीने समजून सांगणारे मानवाधिकार वकील असीम सरोदे आहेत.त्यांच्या कडून संविधान जनते साठी कसे वापरायचे आणि जनतेला कसे जामजावून सांगायचे  हे मी आणि अनेक महाराष्ट्र मधील नागरिक शिकले आहेत . 
 संविधान मधील अनुच्छेद २१ जीवन जगण्याचा अधिकार आणि  सन्मानाने जीवन जगणाच्या अधिकार तसेच व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे आपल्याला संरक्षण कसे आहे हे उदाहरणावरून समजावून बार्शी  मधील कर्मवीर जगदाळे मामा व्याख्यानमाला मध्ये त्यांनी सांगितले होते. त्याचाच अनुभव बघून मी बार्शी मधील अनेक वर्षे खराब रस्त्याची अवस्था याची तक्रार मानवाधिकार आयोगाला केली होती. छोट्या छोट्या गोष्टी जीवनाशी आणि मानवाच्या आधिकाराशी  निगडित आहे हे मी त्यांच्या कडून ऐकले होते त्यावरून रस्ता हा मूलभूत अधिकार आहे. खराब रस्त्यामुळे होणारे परिणाम आणि त्याचा परिणाम समाजाच्या जीवनाशी कसा आहे हे मी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला लिहून पाठवू शकलो. त्या वरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बार्शी ची केस घेऊन ती राज्य  मानवाधिकार आयोगाला पाठवली असून कोर्ट १ वर सुरु होणार  आहे . त्या बद्धल असीम सरोदे याचे बार्शीकरांच्या वतीने आभार . 
 एडवोकेट असीम सरोदे यांची आणि माझी भेट पुणे त्यांच्या ऑफिस येथे झाली. त्यावेळेस त्यांनी  ९५ बिग  एफ एम या रेडिओ चॅनल वर महिलांचे अधिकार या मुलाखतीसाठी चालले होते त्या वेळेस त्यांनी मला वेळ नसला तरी तू माझ्या बरोबर चल आपण गाडीमधून जाऊ असे सांगितले आणि मी गेले. त्या वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते सर्वांसाठी किती महत्वाचे आहे हि चर्चा झाली . आपण पंतप्रधान पासून ग्रामसेवकपर्यंत आणि पंतप्रधान सचिव पासून तलाठी पर्यंत कसे निर्भय पणे बोलू शकतो आणि आपले कश्या प्रकारे ते सेवक आहेत आणि आपण कसे मालक आहोत हे संविधान मार्गातून आणि कायद्याच्या दृष्टीकोनातून समजावून सांगितले. आपण सुप्रीम कोर्ट यांच्या  निर्णयाचे सुद्धा विश्लेषण करू शकतो आणि प्रशाशन आणि राजकारणी याच्या वर टीका सुद्धा मर्यादेत करू शकतो हे संविधान अनुच्छेद १९ नुसार कसे स्वातंत्र्य आहे हे समजावून सांगितले. 
जनहित याचिकेच्या मार्गातून त्यांनी नेहमी सामान्य जनतेचे आवाज न्यायालयात पोहोचवले आणि यशश्वी सुद्धा झाले.मग त्या मध्ये वेश्या व्यवसायातील भगिनींना मतदानाचा अधिकार असो, ट्रॅव्हल  मध्ये विशेष सीजन ला होणारी लूट असो, पर्यावर समस्या असो. मंदिर आणि  मशीद वरती आवाजाचे होणारे प्रदूषण असो किव्वा इतर सामाजिक  मुद्दे असो त्यांनी न्यायपालिका मध्ये यांचा आवाज बुलंद केला. सामाजिक चळवळ मध्ये त्यांनी पुण्यातील बुधवार पेठ वेश्या (देवदासी) भागात वेश्या (देवदासी) साठी झेंडावंदन चालू केले असो किव्वा येरवडा जेल मध्ये कैद्यांना माहिती अधिकार शिकवणे हे जनतेसाठी केले. आंदोलन मध्ये  केन्द्र सरकार ने माहिती अधिकारात बदल केला त्या वेळेस रस्त्यावरील आंदोलन असो त्यांनी नेहमी रस्त्यावरील आंदोलन ते  न्यायपालिका मध्ये न्याय मिळवून देणे या मध्ये सामाजिक कार्य केले. अनेक लॉ  करणारे तरुण मुले त्यांच्या कडून या बाबतीत मार्गदर्शन घेतात. न्यूज चँनल वर असणारी त्यांची चर्चा हि मुद्धेसुर व शांत स्वभावात असती, कुठलाही गोंधळ आणि अरेरावी नाही मुद्देशूर आणि कायद्याने विश्लेषण नुसारच असते. 
काही दिवस आधी फेसबुक वर अंकुश मुढे या मेंढपाळ यांनी मेंढपाळ यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्या टॅब करून असीम सरोदे यांना विनंती केली कि आपण या वर ड्राफ्ट तयार करून कायद्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न करू या वर होकार दिला. सर्व मेंढपाळ सामाजिक कार्यकतें आणि तज्ञ  कमिटी बनवून चर्चा केली त्या वर कायदा तयार करण्यासाठी कार्य चालू आहे. मेंढपाळ यांच्या समस्या आणि त्या वरील उपाय या साठी त्यांनी सेवा म्हणून कार्य करत आहेत.  तसेच संविधान प्रचारक या चळवळ मध्ये संविधान समजून सांगण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी  ते येत असतात. मला त्यांचा एक भावून गेलेला गुण म्हणजे त्यांची  विचारधारा पुरोगामी असली तरी इतर विचारधारेच्या नागरिकांना त्यांनी समजून घेऊनच बोललेल आहे.त्यांनी नेहमी इतर विचारधारा यांचा आदर केला आहे तसेच चुका सुद्धा सांगितल्या ते सुद्धा त्या द्वेष नसलेली आणि त्या विचारधारा मध्ये योग्य घेतलेले सुद्धा दिसले. 
 त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी असेच सामान्य जनतेसाठी न्यायपालिका मध्ये न्याय मिळवून द्यावा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य या वर भारतातील लोकांना निर्भय बनवून समस्या मांडण्याचे आणि सोडवण्यासाठी पायावर उभे करावे हि त्याच्या हृदयात वसत असलेल्या ईश्वर चरणी प्रार्थना 
मनिष रवींद्र देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *