Headlines

संभाजी ब्रिगेड स्नेहमेळावा व पदाधिकारी निवडी संपन्न

पुणे /अमीर आत्तार – २३ सप्टेंबर रोजी मौजे बलवडी येथे संभाजी ब्रिगेड सांगोला सर्व पदाधीकारी व कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळावा, आढावा बैठक तसेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री अमरजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री दिपकदादा वाडदेकर, संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष शिवश्री लखनराज थिटे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील, शहराध्यक्ष राजू शिंदे, उपाध्यक्ष शरद गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल दिघे, संघटक नितीन रणदिवे, लखनराज थिटे, गणेश महांकाळ, पप्पू लेंडवे, शहाजी दिघे, रणजित शिंदे, रोहन शिंदे, मनोज मेटकरी, आकाश ठोकळे, पप्पू पवार, हनी कांबळे, नारायण कदम, सचिन महांकाळ यांच्यासह मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुरोगामी विचारांचे पाईक, संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेवेळी सांगोला तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले शिवश्री राजू मगर यांची संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे मालक इंजी. शिवश्री कौस्तुभ शिंदे यांची सांगोला शहर उपाध्यक्ष पदी व माणुसकी प्रतिष्ठाण च्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असनारे शिवश्री संदिप गिड्डे यांची शहर कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 
त्यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष दिपकदादा म्हणाले की, “आपण सतत २५ वर्ष समाजप्रबोधन करत समाज जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे, आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोनी दिशाभूल करून तरूणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना रोखणे व योग्य मार्गदर्शनकरने आपले काम आहे. आपल्या तरूनांनी जागतिकीकरण समजून घेत आर्थिक साक्षर व आर्थिक सक्षम कसं होता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.” प्रदेशकार्याध्यक्ष अमरजीत पाटील बोलले की, “कसल्याही प्रकारच्या सोई-सुविधा नसताना अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांचे आपण वंशज आहोत कोनत्याच प्रांताच्या, भाषेच्या सिमा आपणांस रोखू शकल्या नाहीत आपल्या मुलांनी आता ग्लोबल झालं पाहिजे, पडेल तो उद्योग व्यवसायात ताकदीने उतरून आपण जागतिकीकरणाचा भाग झालं पाहिजे. बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्गांनेच जाणे सर्वांच्या हिताचे आहे. सांगोला तालुक्याला खुप मोठा सत्यशोधक चळवळीचा वारसा आहे तो परत मोठ्या ताकदीने जागृत करूया, आपल्या वाडवडीलांनी उभारलेली हि चळवळ आपण चांगल्या प्रकारे चालवू, पडेल ते काम करून आर्थिक उन्नती साधून, सामाजिक-सांस्कृतिक शहाणपण मिळवून आपले जीवन सुंदर करू.” 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवश्री मल्हार गायकवाड यांनी केले व आभार भाई राजू मगर यांनी मांडले.त्यानंतर सुंदर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन नितीन रणदिवे आणि शिंदे यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *