Headlines

शासन खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंञी ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्तांना दिलासा

 

प्रतिनिधी अक्कलकोट – जयकुमार सोनकांबळे- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द,बोरी उमरगा, रामपूर, शिरशी येथे वादळी पावसामुळे व नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची तसेच पडझड झालेल्या घरांची पाहणी करण्यासाठी आज सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी केले.नुकसानग्रस्त शेतकरी, पडझड झालेल्या नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील.कोणालाही वार्यावर सोडणार नाही.तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत.तुम्ही सुरक्षित राहा.तुमची काळजी शासन घेईल अशा शब्दात मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्तांना दिलासा दिलाय.नुकसानग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधुन समस्या जाणून घेतल्या.

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी सांगवी खुर्द येथील घर वाहुन गेलेल्या अकरा शेतकऱ्यांना प्रत्येकी ९५ हजार शंभर रूपये असे दहा लाख ४६ हजार शंभर रूपये मदतनिधी धनादेश  दिले.तसेच  रामपुर येथील घरात पाणी शिरून पडझड झालेल्या पाच  नागरिकांना प्रत्येकी ३८०० रूपये असे एकुण एकोणीस हजार व बैल मृत पावल्याबद्दल रमेश बिराजदार यास २५००० असे एकुण दहा लाख ९० हजार शंभर रूपयाचा धनादेश सोमवारी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. बांधावरच मदत निधी दिल्याबद्दल व संवाद साधुन धीर दिल्याबद्दल नागरिकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.

     यावेळी महसूल मंञी बाळासाहेब थोरात, कृषीमंञी दादासाहेब भुसे, पालकमंञी दत्ताञय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महाराज, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंञी सिद्धाराम म्हेञे, आमदार प्रणिती शिंदे, कृषी विभागाचे अपरमुख्य सचिव, अपर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तहसिलदार, पं.स.सभापती, विरोधी गटनेते, व शेतकरी आधीजन मोठ्यासंख्याने उपास्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *