Headlines

वाणीचिंचाळे येथील दुध उत्पादक शेतकर्यांचे दूध दरवाढीसाठी आंदोलन

पंढरपूर/नामदेव लकडे –  सध्या शेतकऱ्यांच्या दूधाला पाण्याच्या दराने दुध स्विकारणे चालू आहे.परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु दूध दर अतीशय कमी दराने घेतले जात आहे. यामुळे उत्पादन खर्च व नफा यामध्ये ताळमेळ घालणे शक्य नाही. यामुळे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू केला.परंतु सध्याच्या काळात या दूध व्यवसायाला घरघर लागली आहे.
वाणीचिंचाळे गावात सध्या दररोज 10000हजार दुध संकलन होत आहे परंतु या व्यवसाय सध्या आतबट्ट्याचा ठरत आहे.सध्या कोणतेही सरकार असुद्या शेतकऱ्यांना दूधाला रास्त 35रु दर मिळावा अशी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. तरच शेतकरी जगेल अन्यथा दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागेल.
यामुळे शेतकऱ्यांनी स्वंयपुर्तीने सर्वपक्षीय दूध ओतून निषेध नोंदवला. तसेच यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सचे पालन करून आंदोलन करण्यात आले. तसेच अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांनी आंघोळ करून असे निराळे आंदोलन केले. तसेच जर दूधाला योग्य भाव मिळाला नाही तर आणखी ति्व स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

सरकार कोणतेही असो दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम कायमस्वरूपी होत आले आहे परंतु आतापासून शेतकऱ्यांनी स्वंयपुर्तीने आंदोलन करून सरकारला जागे होऊन दूधाला किमान 35 रु दर दयावा तरच दूध घातले जाईल अन्यथा एक थेंबही दूध घातले जाणार नाही – दत्तात्रय टेकनर-दूध उत्पादक शेतकरी

जोपर्यंत दूधाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत दूधाचा संप चालू राहणार आहे. तसेच सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. तसेच गावातील खाजगी व सहकारी दूध संस्थानी शेतकऱ्यांना सहकार्य करून हे आंदोलन यशस्वी करावे – बंडू सोपे -मा.ग्रामपंचायत सदस्य वाणीचिंचाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *