Headlines

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी

बार्शी/प्रतिनिधी- मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ,पांगरी पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत मळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीरजी तोरडमल व प्रहार संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शंकर विटकर यांच्या शुभहस्ते करून वृक्षारोपण करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्र राज्याला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकतीने हाताळले,मराठी साहीत्यातील लोकनाट्य,चित्रपट, लावण्या,गवळण,आदी प्रकार सशक्त व समृद्ध केले, तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याच श्रेय अण्णाभाऊ ना दिले जाते,1944 ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले,छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र रशिया प्रयत्न पोवाड्यातून सागितले ,व रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कडून त्यांचा सन्मान देखील झाला.अण्णाभाऊच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला,या कादंबरी मध्ये अण्णाभाऊनी गोरगरीब लोकांचे होणारे,हाल व तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्रियांचे शोषणाचे चित्रण केले आहे.आशा या शिवशाहीराची आज तसेच लातूर जिल्हा प्रहार संघटनेच्या अध्यक्ष पदी शंकर विटकर यांची निवड झाल्या बद्दल मंडळाच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मळेगावचे सरपंच संजयकुमार माळी, मंडळाचे अध्यक्ष अंकुश माळी,पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी,ग्रामसेवक शिवाजीराव गायकवाड,माजी सरपंच सिद्धेश्वर मुंबरे,यशोदीप सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक रशीद कोतवाल,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर पटेल,यशदाचे शिवाजीराव पवार,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,ग्रा.प.सदस्य दशरथ इंगोले,मंडळाचे दीपक निंबाळकर,संदीप विटकर,गिरीश माळी,यशवंत गाडे,आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.संजय माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *