Headlines

लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मायलॅब व सिरम मध्ये निवड

वडाळा- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयांमध्ये बीएससी व एम एस सी बायोटेक्नॉलॉजी आणि इंटरप्रीनिअरशिप हे व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. सदर अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नुकतीच औषध निर्माण क्षेत्रांमध्ये नामांकित असलेल्या तसेच कोरोना महामारी शी निगडीत काम करणाऱ्या मायलॅब डिस्कवरी सोल्युशन व श्री रमेश पुणे या कंपनीमध्ये निवड झालेली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
आकाश गावडे , पवन येलंदडी, कृष्णा खरटमोल , प्रथमेश जगदाळे , ऋषीकेश कादे , प्रमोद शेंडगे , वैभव शिंदे , ऋषिकेश सुर्यवंशी , कु. श्रुतिका ढवण , स्नेहा काशीद , प्राची कुंभार , वैभवी पुराणिक आदींचा समावेश आहे.

वरील विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष देशमुख , अध्यक्ष रोहन देशमुख , सचिव सौ.अनिता ढोबळे , प्र. प्राचार्य डॉ.जितेंद्र बाजारे , विभाग प्रमुख डॉ. किरण जगताप सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *