Headlines

लॉकडाऊनच्या काळात ३६६ गुन्हे दाखल १९८ लोकांना अटक


मुंबई दि. १० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६६ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
           टिकटॉक,फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या ३६ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी १६ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.

जिल्हानिहाय गुन्हे

त्यामध्ये बीड ३५,पुणे ग्रामीण २९जळगाव २६मुंबई २१कोल्हापूर १६नाशिक ग्रामीण १५सांगली १४ठाणे शहर १३बुलढाणा १२जालना १२नाशिक शहर ११सातारा १०पालघर १०लातूर १०नांदेड १०परभणी ८नवी मुंबई ८सिंधुदुर्ग ७अमरावती ७ठाणे ग्रामीण ७नागपूर शहर ७हिंगोली ६गोंदिया ५सोलापूर ग्रामीण ५पुणे शहर ४रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४नागपूर ग्रामीण ४भंडारा ४पिंपरी- चिंचवड ४अमरावती ग्रामीण ४चंद्रपूर ४रायगड २धुळे २वाशिम २यवतमाळ १,औरंगाबाद १ (एन.सी)यवतमाळ १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
           या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १५५ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  Titktok विडिओ शेअर प्रकरणी १६ व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ तर अन्य सोशल मीडियाचा        (ऑडिओ क्लिप्स, youtube ) गैरवापर केल्या प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत १९८ आरोपींना अटक केली आहे. आक्षेपार्ह अशा  १०२  पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
 चंद्रपुर जिल्ह्यातील माजरी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ज्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४ झाली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादीबद्दल चुकीची माहिती असलेली व धार्मिकतेचा रंग देणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होतीत्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *