Headlines

रेशनकार्ड नसणाऱ्यांनाही मिळणार तांदुळ आणि हरभरा


जिल्ह्यातील गरजूंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
            सोलापूरदि.17 : जिल्ह्यातील रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला मे आणि जून महिन्यासाठी मोफत प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि प्रती कुटुंब एक किलो हरभरा देण्यात येणार आहे. याचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 19 जूनपासून धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
            केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय पॅकेजअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि कोणत्याही योजनेत समाविष्ठ नसलेल्या रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. सोलापूर शहरात 110 केंद्रामार्फत सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना तर जिल्ह्यातील 943 केंद्रातील 1 लाख 4169 एवढ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            सोलापूर शहरातील अक आणि ड परिमंडळातील रहिवासी भागात तर जिल्ह्यात प्रत्येक गावातील रेशन दुकानात आधारकार्डासह गेल्यानंतर धान्य मिळेल.
            राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला तांदुळ आणि हरभरा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठीचा तांदुळ आणि हरभरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. अंदाजे 12 हजार 102 क्विंटल तांदुळ आणि 735 क्विंटल हरभरा वितरण करण्याचे नियोजन केले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले.
अ परिमंडळातील रेशन दुकानदार
            विनायक जाधव (उत्तर कसबा)वनमाला केंजळे (190बुधवार पेठ)अरविंद बागदुरे (उत्तर कसबा)सिद्धाराम सुतार ( 467शुक्रवार पेठ)नंदकुमार जगताप (124बुधवार पेठ)मधुकर गायकवाड (तांडाशिवाजीनगर)साईतिर्थ सहकारी गृहनिर्माण संस्था (191बुधवार पेठ)सोलापूर सोशल असोसिएशन (915शुक्रवार पेठ)इंडियन कंझ्युमर को.ऑप. सोसायटी (416बेगम पेठ)किर्ती मजूर सहकारी गृहनिर्माण संस्था (90बुधवार पेठ)सुप्रभात सर्व व्यवसाय सहकारी गृहनिर्माण संस्था (बुधवार पेठ)बाळे सेवा सहकारी संस्था (वाणी गल्लीबाळे)बाळे विकास कार्यकारी सोसायटी (अंबिकानगरबाळे)जिजामाता महिला सहकारी गृहनिर्माण संस्था (गोल्ड फिंच पेठ)राजदिप विविध वस्तू उत्पादक संस्था (41/146न्यू बुधवार पेठ)सोलापूर सोशल असोसिएशन (248बेगम पेठ)मराठा युवक मंडळ (4बुधवार पेठ)अमर भीम क्रीडा मंडळ (41/115न्यू बुधवार पेठ)आम्रपाली समाज सेवा मंडळ (केगाव)दयावान मागासवर्गीय सहकारी संस्था (197/6बुधवार पेठ).
ब परिमंडळातील रेशन दुकानदार
            चंद्रकांत तांबे (मड्डी वस्तीभवानी पेठ)नरेंद्र सर्व व्यवसायी सहकारी ग्राहक संस्था (रविवार पेठ)सूर्यकमल सर्व व्यवसायी कंझ्युमर्स सोसायटी (तुळशांतीनगरजुने विडी घरकुल)मध्यमवर्गीय सर्व व्यवसायी ग्राहक संस्था (कन्ना चौक)मध्यमवर्गीय सर्व व्यवसायी ग्राहक संस्था (घोंगडे वस्तीभवानी पेठ)मुकुंद सर्व व्यवसाय ग्राहक संस्था (जोडभावी पेठ)आदर्श ज्योती सहकारी ग्राहक संस्था (जोडभावी पेठ)मधू सर्व व्यवसाय ग्राहक संस्था (साखर पेठ)प्रियदर्शनी महिला बिडी कामगार (रविवार पेठ)शेळगी विविध कार्यकारी संस्था (शेळगी गावठाण)गोंधळी समाज सर्व व्यवसाय ग्राहक संस्था (गांधीनगररविवार पेठ)प्रभा महिला सर्व व्यवसाय ग्राहक संस्था (मड्डी वस्तीभवानी पेठ).
क परिमंडळातील रेशन दुकानदार
            दत्त नगरच्या आजूबाजूचा परिसर (केंद्रप्रमुख-9372602002)अशोक चौक (9822899172)शास्त्रीनगर (8669077441)लोधी गल्ली/लष्कर/कामाठीपुरा (9503388802)निलमनगर/एमआयडीसी (9422460928)मौलाली चौक/कुंभार गल्ली (9595828248)कल्याण नगर/ रेणुकानगर (9503544084)माधवनगर/आकाशवाणी केंद्र (8329392477)कर्णिक नगर पूर्ण (9975125670)सुनिलनगर आजूबाजूचा भाग (9225923342)हत्तुरेवस्ती आजूबाजूचा भाग(9881258495)नई जिंदगी आजूबाजूचा भाग (9665674950)स्वागतनगर आजूबाजूचा भाग (9325772349)संगमेश्वरनगर (9960132887)सैफुल आजूबाजूचा भाग (7588573999)तेलंगी पाच्छा पेठ आजूबाजूचा भाग (7350475664) आणि आसरा चौक आजूबाजूचा भाग (9325295135).
शहरातील ड परिमंडळातील रेशन दुकानदार आणि जिल्ह्यातील सर्व गावातील रेशन दुकानात धान्य 19 जूनपासून वाटप करण्यात येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *