Headlines

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोवीड विद्यार्थी-पालक अभियानाला सुरुवात

पंढरपूर /रविशंकर जमदाडे -राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिलजी गव्हाने यांच्या वतीने आजपासून कोवीड विद्यार्थी पालक अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे.
या अभियानाच्या माध्यमातून जा विद्यार्थ्यांचे पालकांना कोरोना ची लागण झाली आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तीने घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे कार्याध्यक्ष राकेश साळुंखे यांनी अभियानाच्या माध्यमातून केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने आणि सर्वांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि विद्यार्थी यांच्यामधील दुवा होण्याचे काम करत आहोत विषाणूमुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक जॉब सोडून गेले त्या विद्यार्थी त्या आपल्या विद्यार्थी मित्रांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना मदतीचा हात आपण द्यायला हवा ही सामाजिक जबाबदारी समजून घेत या अभियानात सामील होतजास्तीत जास्त विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्यातील होण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत .
कोण कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या अभियानातून आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनां मदत करण्याचं ठरवलं आहे. गरजु विद्यार्थ्यांनी व दानशूर व्यक्तींनी मों नंबर:- ८८०६६८०५९९ वर संपर्क साधावा अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पंढपूर मंगळवेढा विधानसभेचे कार्याध्यक्ष राकेश सांळुखे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *