Headlines

राज्यातील शेळी-मेंढी व जनावरांच्या सर्व बाजारपेठा सुरू करा÷शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे

प्रतिनिधी/ नामदेव लकडे-गेल्या ६ महिन्यांपासून करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेळी-मेंढी व जनावरांच्या महाराष्ट्रभरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता बिइंग महाराष्ट्रातील इतर सर्व बाजारपेठा या सरकारने सुरू केलेल्या आहेत व नुकतीच बससेवाही सरकारने सुरू केलेली आहे.परंतु सरकारने अजूनही शेळी-मेंढी व जनावरांच्या बाजारपेठा सुरू केलेल्या नाहीत.सर्व बाराजपेठा बंद असल्यामुळे शेतकरी बांधव व शेळी-मेंढी पालन करणारा धनगर समाज हवालदिल झालेला आहे.
 यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.यामुळेच जिल्ह्यातील येथील शेतकऱ्यांनी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांच्याकडे तेथील बाजरपेठ सुरू करण्याविषयी व्यथा मांडली.संघटनेने लगेच महाराष्ट्राचे दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.कारण हा विषय सविस्तर मांडून.शेतकरी आणि व्यापारी शेळी-मेंढी पालन करणाऱ्या धनगर समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या तसेच हा विषय गंभीर असून यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.  असे मत शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा सुरू करण्याविषयी सरकारने सकारात्मक निर्णय लवकरच घ्यावा.सकारात्मक आश्वासन महाविकास आघाडी सरकारने द्यावे.या अथक प्रयत्नामुळे राज्यातील जनावरांच्या व शेळी-मेंढ्यांच्या सर्व बाजारपेठा लवकरच सुरू कराव्यात.
यामुळे हवालदिल झालेल्या मेंढपाळ बांधवांना मोठा दिलासा मिळले. आणखी एक महत्वाचा मुद्दा की, सरकारने मेंढपाळांना ६ हजाराचे अनुदान जाहीर केले होते,परंतु ते त्यांना मिळत नाही.गेल्या ६ महिन्यांपासून शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीसाठी सर्व बाजारपेठा बंद आहेत.आणि अशा परिस्थितीमध्येच सरकारने जाहीर केलेले अनुदान मेंढपाळांना मिळत नसेल तर त्यांनी उदरनिर्वाह कशावर करायचा?यावर महाविकास आघाडी सरकारने विचार करावा.कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला आहे.येत्या महिनाभरात सर्व मेंढपाळांना अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे महाविकास आघाडी सरकाराचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांच्याकडे निवेदनाव्दारे  मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *