Headlines

राज्यातील धरणांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तातडीने सादर करावा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आदेश

मुंबईदि.११: राज्यातील लघु पाटबंधारे योजनांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करावा अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विभागाला दिल्या.
श्री गडाख म्हणाले,मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व धरणांचा मान्सूनपूर्व तपासणी अहवाल वेळीच सादर केला जाईल याची दक्षता घ्यावीतसेच धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात व धोकादायक धरणे सुस्थितीत येतील याची कटाक्षाने दक्षता घ्यावीया बाबत कुठालाही हलगर्जीपणा होणार नाही यासाठी दक्ष रहावे.
 मान्सून पूर्व धरण तपासणी तसेच धोकेदायक धरणांना सक्षम अधिका-यांनी भेटी देऊन आवश्यक उपाययोजना करणे ही अत्यावश्यक बाब म्हणून गृहीत धरण्यात यावी,मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत पुर्ण झालेल्या व पाणीसाठा होत असलेल्या योजनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधान्याने करावयाची कार्यवाही व उपाययोजनांसाठी  देण्यात आलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे असे श्री गडाख यांनी सांगितले.
पावसाळ्यादरम्यान धरणफुटी अथवा क्षतीग्रस्त  होण्याची घटना उद्भवू नये यासाठी प्राधान्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत पत्राद्वारे सविस्तर सुचना दिलेल्या आहेत. महसुलपोलीस व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मान्सुनपुर्व दुरुस्ती करणेतलावालगतच्या मनुष्यवस्तींना सूचना देणेप्रथम पाणिसाठा करताना घ्यवयाची काळजी या सर्व बाबींविषयी येणा-या पावसाळ्यापुर्वी  प्रथम प्राधान्याने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
 मान्सूनपूर्व धरणाच्या तपासणी करीता मृद व जलसंधारण प्रादेशिक मुख्य अभियंतायांच्या पत्राव्दारे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी तथा अधीक्षक अभियंतामृद व जलसंधारण विभागजिल्हा जलसंधारण अधिकारी तथा कार्यकारी अभियंतामृद व जलसंधारण विभागव त्यांचे अधिपत्याखालील क्षेत्रिय कर्मचारी यांना, COVID19 आजार व कोरोना या विषाणूच्या संसांर्गाच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या सूचना व घ्यावयाचीच सर्व दक्षता यांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यासाठी प्रवास करण्यास विशेष बाब म्हणून अनुमती देण्यात आली असल्याचे श्री गडाख यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *