Headlines

रस्त्याचे डांबरीकरण करा …….अन्यथा आमरण उपोषण

माढा /राजकुमार माने – उंदरगाव ते उपलाई (खुर्द) , वाकाव रस्ता ते नाईकवाडे वस्ती क्र.1 व वस्ती क्र. 2 , दारफळ रस्ता ते माने वस्ती या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे , या आशयाचे निवेदन उंदरगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच बालाजी नाईकवाडे यांनी मा.तहसिलदार सो.माढा यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की उंदरगाव ते उपलाई (खुर्द) हा रस्ता पालखी मार्ग आहे.रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गाने पालखी सुध्दा नेता येणार नाही. गावातील 70 % लोकांची शेती याच मार्गावर आहे.या रस्त्याची दुरावस्था झाली आहे . अनेक शेतकर्‍याची जनावरे शेतात असून त्यांना शेतातून गावात दूध वाहतूक करणे खराब रस्त्यामुळे शक्य होत नाही.त्यामुळे दूध वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे रस्ते लवकरात लवकर डांबरीकरण करण्याचे आदेश संबधित विभागास द्यावेत ,अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

अन्यथा 15 आगस्ट 2020 पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

घरा मध्ये माझी आजी आजारी आहे. तिला उठता येत नव्हते त्यामुळे दारफल मधील चारचाकी गाडी ला फोन केला जाण्यासाठी पण रस्ताची ही अवस्था पाहून त्याने नकार दिला. शेवटी तिला ट्रॅक्टर मधून रस्त्याला आणावे लागले. मग पुढे हॉस्पिटलमध्ये गेलो – विजय माने

दररोज दूध वाढायला माढयाला जावे लागते . सकाळी गाडीला 2 कन व संध्याकाळी 2 पण या रस्त्यामुळे आठवड्यातुन एकदा तर दोन तीन शेतकरी दूध नेताना गाडी घसरून दूध सांडते , त्यामुळे बरेच नुकसान होत आहे. अगोदरच दुधाला दर नाही आणि त्यात हे नुकसान – पवन माने दूध उत्पादक शेतकरी

Leave a Reply