Headlines

रयत क्रांती संघटना व नवहिंदवी स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक बहू.संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

माढा/राजकुमार माने -रयत क्रांती संघटना व नवहिंदवी स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक बहू.संस्था, उंदरंगाव यांच्या वतीनं आज 12/9/2020 रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत . 
त्यात असे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान म्हणत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष आण्णा जाधव , उंदरगाव चे युवा नेते अभयसिंह मस्के, रयत क्रांती संघटनेचे नेते पंडित साळुंके , अमोल केसरे,यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन पार पडले. पत्रकार बाबासाहेब लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वजित पाटील, राजाभाऊ नाईकवाडे, तानाजी मोटे, अमोल तांबिले,अजिंक्य कासार, औदुंबर लवटे,जमीर शेख गणेश चव्हाण, उमेश आरे, दादासाहेब तांबिले,आबासाहेब कोळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यक्रमा साठी उपस्थित होते. शिबिरात एकूण 32 जणांनी रक्तदान करून सहकार्य केले. कोरोना काळात रक्ताची टंचाई असताना उंदरगावातील तरुणांनी रक्तदान शिबिर आयोजित करून खऱ्या अर्थाने एक आदर्श निर्माण करण्याचे काम केले असे मत डॉ.हेडगेवार रक्तपेढी चे हरहरे साहेब यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *