Headlines

रणसंग्राम च्या वतीने दुधोंडी येथे निर्जंतुक फवारणी

निर्जंतुक औषध फवारणी करताना रणसंग्रामचे स्वयसेवक  

सांगली/पलूस ::- दुधोंडी गावात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हायप्रोक्लोराईडची निर्जंतुक फवारणी रणसंग्राम सोशल फौंडेशन च्या वतीने  करण्यात आली.  दुधोंडी गावातील कोरोना प्रादुर्भाव असणाऱ्या प्रमुख ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असल्याचे रणसंग्राम सोशल फौंडेशन चे अध्यक्ष अँड दिपक लाड व शिवाजी रावळ यांनी सांगितले.रणसंग्राम चे संघटक विशाल कोंढाळकर,सचिन शिंदे, विनायक दिवटे व इतर स्वयंसेवकांनी फवारणीसाठी परिश्रम घेतले . निर्जंतुकीकरण फवारणी केल्यामुळे दुधोंडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात असल्याचे विजय अरबुने यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय अरबुने नागरिकांनी गावातील सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करून घेण्यासाठी पुढाकार घेतला.

यावेळी रणसंग्राम चे संघटक हनीफ शेख म्हणाले  निर्जंतुकीकरण फवारणीसाठी रणसंग्राम चे योद्धे सुरवातीपासून अग्रभागी आहेत.औषध फवारणी करणारे शिलेदार राष्ट्र भावनेने प्रेरित झालेले असून, फवारणीसाठी तांत्रिक बाबींचा अनुभव असणारे तरुण स्वतःची सुरक्षा घेत परिसरामध्ये फवारणी करून देत आहेत. निर्जंतुकीकरण फवारणी साठी रणसंग्राम सोशल फौंडेशन चे कोरोना संकटसमयी मीच माझा रक्षक असे निर्जंतुकीकरण पथक स्थापन केले असून कोरोना जागृती चे संदेश देणारे टी शर्ट, फेसशिल्ड सुरक्षाकीट घालून फवारणी केली जाते असते,अशी माहिती  रणसंग्राम चे संघटक विशाल कोंढाळकर यांनी संगितले. आजूबाजूच्या गावामधून निर्जंतुकीकरण फवारणी साठी आवश्यकता भासल्यास रणसंग्राम सोशल फौंडेशन कुंडल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कुमार जावीर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *