Headlines

योद्धा प्रतिष्ठान तडवळे , महाराष्ट्र संवाद कट्टा आयोजित ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

बार्शी – योद्धा प्रतिष्ठान तडवळे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र संवाद कट्टा यांच्या वतीने  राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा राबविण्यात आली. तर स्पर्धा ही खुल्या गटात राबिवण्यात आली होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून यात स्पर्धाकांनी सहभाग घेतला गेला. 
या स्पर्धेत सहभागी कवींनी सामाजिक आशय असणार्‍या कविता सादर केल्या. ही स्पर्धा युट्युब च्या माध्यमातून राबविण्यात आली.यात 82 स्पर्धक 28 हजार ऑनलाईन प्रेक्षकांनी सहभाग नोंदवला . या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे (1500 रु व प्रमाणपत्र )बक्षिस राष्ट्रवादी पदवीधर संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैभव साळुंखे , द्वितीय क्रमांक(1000  रु व प्रमाणपत्र ) इंजि.पंकज गायकवाड अध्यक्ष पदवीधर संघटना व कंत्राटदार संघटना महाराष्ट्र राज्य , तृतीय क्रमांकाचे (7 00 रु व प्रमाणपत्र )बक्षिस डॉक्टर.सुनिल कायंदे यांच्याकडून देण्यात आले.
या ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचा निकाल फेसबुक द्वारे प्रजोत काटकर यांनी जाहीर केला . या स्पर्धेत गणपत निवृत्ती नागदरवाड,नांदेड यांनी प्रथम ,शिवसिंग भाऊलाल डोंगरजाळ,औरंगाबाद  यांनी द्वितीय , तर स्वाती शंकर निकम, पुणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.स्पर्धा राबवण्यासाठी सुरज पवार यांनी मुख्य समन्वयक व  परिक्षक म्हणून बार्शी येथील प्रा. सुरेश आबा राऊत यांनी काम पाहिले . स्पर्धा पार पाडण्यासाठी योद्धा प्रतिष्ठान तडवळे चे संस्थापक चाणक्य लोखंडे तसेच अध्यक्ष प्रदीप पिसके व महाराष्ट्र संवाद कट्टा चे आशिष कोळी यांनी कष्ट घेतले.अशी माहिती स्पर्धेचे आयोजक सूरज पवार यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *