Headlines

युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर


तुळजापूर/अक्षय वायकर –  “जागतिक हात धुणे दिवस” च्या निमित्ताने “हाताची स्वच्छता सर्वांसाठी” या   मोहिमे अंतर्गत  युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रात  घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम झूम ऑनलाइन (ॲपच्या माध्यमातून) आज संपन्न झाला. 

या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यानी बक्षिस फटकावले. त्यामध्ये सिद्धाराम नागनाथ काम शेट्टी (जि. प. प्रशाला मुरूम तालुका उमरगा) याने चित्रकला पोस्टर मध्ये तृतीय क्रमांक तर प्रांजल दत्ता ढवळे इयत्ता 7 वी (सौ ताराराणी प्रशाला भूम) हिने वक्तृत्व (हात धुण्याचे महत्त्व) स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.

या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून 402 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुनम निकम इयत्ता नववी विद्यार्थिनी, डॉ. कमलादेवी आवटे. (सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य), कु. सिद्धी काळे (प्रमुख पाहुणे), मा.युसुफ कबीर (युनिसेफ, महाराष्ट्र), मा.आनंद घोडके (युनिसेफ, महाराष्ट्र), मा.राघवेंद्र मुनघाटे (शिक्षणाधिकारी, गडचिरोली)., मा. अंबादास मानकर (शिक्षणाधिकारी, वाशिम) हे मान्यवर उपस्थित होते.

15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुणे दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून  11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.  

या स्पर्धांमध्ये हात धुण्याची पद्धती आणि जनजागृती तयार करणारा व्हिडिओ तयार करणे. 

हात कधी कधी धुवावे आणि त्याचे महत्त्व सांगणारे चित्र किंवा पोस्टर काढणे. 

नाविन्यपूर्ण हात धुण्याचे ठिकाण बनवणे आणि त्याचे फोटो काढून पाठवणे. 

वॉश टॉक व्हिडिओ हात धुण्याचे महत्त्व सांगणारे वक्तृत्व 

अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून जवळजवळ २१७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या दरम्यानच्या काळात जवळजवळ ४३ हजार ५५४ लोकांनी सी.वाय.डी.ए.च्या फेसबुक पेजला  ३ हजार  ५००  संकेतस्थळाला भेट देऊन स्पर्धेबद्दल माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *