बार्शी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपदान केले आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील 259 विध्यार्थ्यान पैकी 252 विद्यार्थी ऊतीर्ण झाले आहेत. कला शाखेतील 262 पैकी 226 विद्यार्थी ऊतीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेचा 97.29 % ,कला शाखेचा निकाल 86.25 % लागला आहे.तर महाविदयालायचा निकाल 91.74 लागला आहे.
बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ.वर्षाताई झाडबुके , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच.एस.पाटील , उपप्राचार्य श्री सुर्वे ए.डी व पर्यवेक्षक श्री.खराडे एस.आर यांनी महाविद्यालयातील सर्व ऊतीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनीचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.अशी माहिती प्रवीण मस्तुद यांनी दिली.