Headlines

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी केल्यानंतर प्रवेश

तुळजापूर/अक्षय वायकर- : विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला डॉ. मोहन बाबरे व उपप्राचार्य रमेश नन्नवरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

कला विज्ञान वाणिज्य आणि एमसीवीसी या शाखेच्या अकरावी आणि बारावी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सात महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर महाविद्यालयात प्रवेश केला त्यांना प्राचार्य डॉ. मोहन बाबरे व उपप्राचार्य रमेश नन्नवरे यांनी कोरोना संसर्गाची अनुषंगाने तपासणी व आवश्यक त्या सूचना दिल्या

यावेळी प्राध्यापक आर.पी. गायकवाड, प्रा. एस. एस. भोसले, प्रा. सी. के. कुरेशी, प्रा. अमर भरगंडे, प्रा. अमर बोरगावकर, प्रा. सी. डी. काठेवाड, प्रा. एस. आर. मुसळे, प्रा. एस .पी. कठारे, प्रा. सी. टी. तांबे, प्रा. ए. ए. जोशी, प्रा. आर. एम. इंगळे, प्रा. ए. जे. माने, प्रा. रामलिंग थोरात, प्रा जी व्ही पाटील, प्रा. रत्नाकर उपासे, प्रा. दत्तात्रय देवगुंडे, अधीक्षक धनंजय पाटील यांच्यासह इतर कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या सात महिन्याच्या काळामध्ये घरांमध्ये बसून खूप त्रास सहन करावा लागला कारण कोणतीच मोकळी त्या काळात नव्हते यापुढील काळात आम्ही योग्य ती खबरदारी घेऊन महाविद्यालयामध्ये येणार आहोत आम्हाला आज खूप छान वाटते आहे अशा प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गातून महाविद्यालयात आल्यानंतर मिळाल्या.

Leave a Reply