Headlines

मेघदूत’ व्याख्यानमालेचे आयोजन कवी कालिदास मंडळाचा उपक्रम

बार्शी:- येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने दरवर्षी महाकवी कालिदासदिनाच्या औचित्याने कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.याहीवर्षी कोविड 19 च्या परिस्थितीचा विचार करता कवी कालिदास मंडळाने चार दिवस ऑनलाईन ‘ मेघदूत ‘ व्याख्यानमाला आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी दिली.


कालिदास महोत्सवाच्या माध्यमातून साहित्यिक आणि वैचारिक चळवळ उभी करणाऱ्या कालिदास मंडळाने कोविड च्या काळातही नव्या माध्यमांचा उपयोग करून साहित्यसेवा सुरू ठेवली आहे .या व्याख्यानमालेत पुढील व्याख्याने संपन्न होणार आहेत.


दि 20 जुलै पुष्प 1 ले :” कवितेतील आषाढ “- सुनील शिनखेडे ( ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक – सोलापूर) दि21 जुलै पुष्प 2 रे: ‘माझ्या कवितेचा प्रवास’ – माधव पवार (प्रख्यात कवी -सोलापूर) दि 22 जुलै पुष्प 3 रे : “जगण्याचं गाणं करणाऱ्या इंदिरा संत” – स्नेहा शिनखेडे (लेखिका ,कवयित्री, प्रवचनकार, वक्त्या-सोलापूर) दि 23 जुलै पुष्प 4 थे: ‘कालिदासाचे मेघ संमोहन’- आश्लेषा महाजन ( प्रख्यात कवयित्री, लेखिका , वक्त्या,बालसाहित्यकार-पुणे)
.ही सर्व व्याख्याने ‘कवी कालिदास मंडळ,बार्शी’ या फेसबुक पेजवर सांयकाळी 7 वाजता होतील तरी या व्याख्यानमालेचा आस्वाद घेण्याचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष जयसिंग राजपूत यांनी केले आहे.


सदर व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रकाश गव्हाणे ,मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी,शब्बीर मुलाणी, सुमन चंद्रशेखर, डॉ कृष्णा मस्तुद,डॉ रविराज फुरडे,प्रा अशोक वाघमारे,चन्नबसवेश्वर ढवण,गंगाधर आहिरे,आबासाहेब घावटे,शिवानंद चंद्रशेखर, संतोष पाठक आदी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *